जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप.
जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप.
शिराळा -प्रतिनिधी.
पाचगणी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा, पाचगणी येथे माजी विद्यार्थी श्री. अजित शंकर चव्हाण,श्री .शंकर रघुनाथ पाटील,श्री.अनिल बाळकृष्ण पाटील, सौ. अंजना सुधीर पाटील गाव (काळगाव) यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.या कार्यक्रमात इयत्ता १ ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स व छत्री इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंच सौ.दिपाली संदिप पाटील, सौ.शर्मिला अमोल इनामदार, श्री. रघुनाथ शंकर पाटील, श्री. पांडुरंग शंकर पाटील, श्री. अशोक श्रीपती चव्हाण, श्री.जगन्नाथ यशवंत पाटील, संदिप पाटील, राम पाटील, अमोल इनामदार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवी काळबांडे, हुमणे सर, कृष्णा कांबळे, शिक्षकवृंद , पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलच्या आठवणी शेअर करत विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास व प्रगतीचा सल्ला दिला. “या शाळेनेच मला शिकवले, घडवले. त्यामुळे शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले.मुख्याध्यापकांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानत सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक प्रेरणा मिळते आणि समाजामध्ये सकारात्मकता निर्माण होते.”कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आभार प्रदर्शन केले व आनंद व्यक्त केला.






Comments
Post a Comment