कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे प्रवीण बनसाली यांचे अन्न रसायनशास्त्र या  विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

सध्या ते अलायन्स युनिव्हर्सिटी बेंगलोर येथे प्राध्यापक आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनात स्वयंपाक करताना आपण जे नॉनस्टिक भांडी वापरतो त्यामध्ये टॅफलोन हे पॉलीमर असते जे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. तसेच आपण जे प्लॅस्टिक प्लेट्समधून गरम अन्न खातो त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो त्यामुळे  प्लॅस्टिकचा वापर टाळावा अशा प्रकारे मार्गदर्शन केले. 

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. पूजा भोसले व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .