बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

 बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई - प्रतिनिधी.

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी "कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर" बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी  तर्फे आयोजन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय "कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर" आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना संघटन कौशल्य, समाजप्रबोधन, प्रचार तंत्रज्ञान, विचारप्रणाली आणि चळवळीतील भूमिका या बाबतीत प्रशिक्षित करणे आहे.या शिबिरात बी आर एस पी  चे राष्ट्रीय अध्यक्ष   ॲड. डॉ. सुरेश माने, तसेच इतर ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. चळवळीचे स्वरूप, राजकीय दिशा, तसेच सामाजिक न्यायाच्या लढ्यात कार्यकर्त्यांची भूमिका या विषयांवर सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. मार्गदर्शन शिबिर दि.  27 जुलै 2025 सकाळी 9 वाजता  पद्मशाली हॉल, बी जे देवरुखर मार्ग, नायगाव, दादर पूर्व, मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बी आर एस पी चे मुंबई प्रदेश अध्यक्ष दीपक चौगुले यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .