सद्गगुरु बाबा महाराज विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी तयार केले सिड्सबॉल.
सद्गगुरु बाबा महाराज विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी तयार केले सिड्सबॉल.
उंडाळे -प्रतिनिधी.
रयत शिक्षण संस्थेच्या सद्गगुरु बाबा महाराज विद्यालय, सवादे ता.कराड मध्ये प्रत्येक वेळेला नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात या उपक्रमात विद्यार्थी भाग घेतात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे सीड्स बॉल (बीज गोळे) तयार करणे .
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन करण्याची त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावे या हेतूने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दरेकर उषा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली मुलांना आवाहन केले आणि बघता बघता जवळपास आठ हजार सिड्स बॉल विद्यार्थ्यांकडून तयार झाले. ते फेकण्यासाठी जवळच असणाऱ्या लटकेवाडी चा डोंगर व आजूबाजूचा परिसर याची निवड करण्यात आली. या उपक्रमांतर्गत मुलांना वर्षा सहलीचा आन॑द देखील मिळाला याप्रसंगी शिक्षक संतोष जाधव, मानसिंग पवार, अभिजीत देशमुख, श्याम सुतार, चंद्रकांत वाघमारे,विजया थोरात,पुष्पा साठे उपस्थित होते. उपक्रमाची साऺगता मुलांमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने झाली.

Comments
Post a Comment