वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.
उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.
शिराळा - प्रतिनिधी.
उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा व प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरूण इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, तपासणी ते उपचार बांधकाम कामगार योजना तसेच इतर शासकीय योजनेअंतर्गत रुग्णांची तपासणी उपचार व गरजेनुसार शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी या मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं अहवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा व प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरूण इस्लामपूर यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे. हे शिबिर सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरूण इस्लामपूर येथे संपन्न होणार आहे.

Comments
Post a Comment