कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सवात संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सवात संपन्न.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
गुरु विषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. म्हणून या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांमध्ये प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिप प्रज्वलनाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी गुरुचे महत्त्व सांगताना गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतात ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात आणि आपले जीवन घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गुरुपौर्णिमा हा गुरुप्रती आदर आणि प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून हा एक दिवसाचा कार्यक्रम न करता तो दैनंदिन जीवनात कायम असावा असे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी प्रा. प्रियांका माळी व विद्यार्थ्यांच्यामधून दीक्षा साबळे, करीना कारंडे, सानिका मोहिते, अंकिता पाटील, मृणाल बेरडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीना कारंडे व आभार दीक्षा साबळे यांनी मानले.
.jpg)
Comments
Post a Comment