सद्गुरु बाबा महाराज विद्यालय सवादे येथे दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

 सद्गुरु बाबा महाराज विद्यालय सवादे  येथे दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

उंडाळे -प्रतिनिधी.

 रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु बाबा महाराज विद्यालय सवादे तालुका कराड येथे एस.एस.सी बॅच 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यानींचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यामध्ये विद्यालयात प्रथम आकांक्षा येडूदेव साठे 90% द्वितीय हर्षाली आनंदा पाटील 89% तृतीय नेहा गणेश बांदेकर 87 40% यांचा सत्कार करण्यात आला

         कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य मा. श्री. वसंतराव चव्हाण संस्थापक राहुल उद्योग समूह हे होते . कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. प्राचार्या डॉ.वैशाली पाटील यांनी मुलांचा सत्कार रोख रक्कम व भेटवस्तू देऊन केला. याप्रसंगी त्यांनी मुलांना भविष्यातील संधी कोणत्या आहेत याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका दरेकर उषा रंगराव यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यानी भविष्याचा वेध घेऊन पुढील शिक्षणाची निवड करावी असे सांगितले. याप्रसंगी श्री. मोहन चव्हाण, श्री. शिवाजी थोरात, श्री.संपत थोरात, श्री.उत्तमराव थोरात, श्री. भीमराव पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री वाघमारे  चंद्रकांत यांनी केले तर आभार श्री संतोष जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .