महिला महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न.

 महिला महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न.

कराड -  प्रतिनिधी.

शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड येथे रोजगार मेळावा मंगळवार दि. 22/07/2025 रोजी  उत्साहात संपन्न झाला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा महिला महाविद्यालयात उमेदवारांच्या भरघोस प्रतिसादाने संपन्न झाला. यावेळी  नामांकित कंपनीमध्ये उमेदवारांच्या मुलाखती द्वारे निवडी करण्यात आल्या. या मेळाव्याद्वारे बेरोजगार युवक युवतीना रोजगार उपलब्ध झाला.महिला महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी मा.सुनिल पवार  सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग सातारा,डॉ. अनिल हुद्देदार. अध्यक्ष शिक्षण मंडळ कराड,मा.बाळासाहेब कुलकर्णी चेअरमन शिक्षण मंडळ कराड,मा. चंद्रशेखर  देशपांडे सचिव शिक्षण मंडळ कराड,मा. उदय थोरात. कौन्सिल सदस्य शिक्षण मंडळ कराड,प्राचार्य. डॉ. बी. बी. बल्लाळ,उपप्राचार्य डॉ. पराग सोनटक्के,मा. एस के कुलकर्णी. संचालक कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट. मा. रेखा देशपांडे. ए.पी. आय. कराड, तसेच शिक्षण मंडळ कराडचे पदाधिकारी, महिला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, मुलाखतीसाठी आलेले उमेदवार यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .