अर्थसाक्षरता काळाची गरज - प्राचार्य डॉ सतिश घाटगे.

 अर्थसाक्षरता काळाची गरज - प्राचार्य डॉ सतिश घाटगे.

 

कराड - प्रतिनिधी.
शिक्षण मंडळ,कराड संचालित महिला महाविद्यालय कराड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ६ जुलै थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. वि.म.दांडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून “अर्थजागृती” सदराचे उद्घाटन एस.बी. एस कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतिश घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग सोनटक्के होते. 
   आपले विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.घाटगे म्हणाले की,प्रत्येकाने अर्थसाक्षर झाले पाहिजे जेणेकरून देशांमध्ये आर्थिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल.       अर्थजागृती सदरामुळे विद्यार्थिनींना अर्थशास्त्रीय संज्ञा,
संकल्पना,आर्थिक घडामोडी यांचे ज्ञान मिळेल हा एक आदर्श उपक्रम आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.बी.बी.बल्लाळ यांच्या प्रेरणेतून सदर उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी प्रो.डॉ.एस.आर.प्रभुणे,प्रो.डॉ.यु.एन.ताठे,डॉ.ए.व्ही.शिंदे,प्रा.व्ही.एस.सुर्वे,डॉ.पी.व्ही.मिसाळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.व्ही.एस सागरे सूत्रसंचालन प्रा.एस.आर.पाटील तर आभार प्रा.आर.बी.पवार यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक,प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .