वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान मार्फत अनुलोम गुरुगौरव कार्यक्रम संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान मार्फत अनुलोम गुरुगौरव कार्यक्रम संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुगामी लोकराज्य महाअभियान मार्फत अनुलोम गुरुगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अनुगामी लोकराज्य महाअभियान, महाराष्ट्र राज्य सांगली -कोल्हापूर जिल्हा प्रमुख जनसेवक मा. प्रशांत कुंभार, अनुलोम मित्र मा. सागर गायकवाड साहेब, व मा. विलास पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत अनुलोम गुरुगौरव कार्यक्रम संपन्न झाला. तर कार्यक्रम अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. सी. सदावर्ते होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. ए.आर पाटील -साळुंखे यांनी केले. अध्यक्ष निवड व्ही. डी. पाटील यांनी केली तर अनुमोदन सौ. एस. ए.पाटील यांनी दिले.उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मा. मुख्याध्यापक ए. सी.सदावर्ते यांनी केले.जनसेवक मा. प्रशांत कुंभार , अनुलोम मित्र मा. सागर गायकवाड , व मा. विलास पाटील आदिंच्या शुभहस्ते विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक यांचा विशेष सत्कार व सन्मान करून गुरू गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.विद्यालयातील ज्युनिअर विभाग शिक्षक भरत नलवडे यांनी गुरुपौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील गुरु माहात्म्य, गुरू - शिष्य परंपरा, आधुनिक काळात गुरू शिष्य श्रद्धा, निष्ठा मोल याविषयी माहिती दिली.जनसेवक मा. प्रशांत कुंभार यांनी आपल्या मनोगतात अनुगामी लोकराज्य महाअभियानांतर्गत १०८ शाळां मध्ये अनुलोम गुरुगौरव कार्यक्रमाबद्दल माहिती देत गुरू गौरव, गुरू -शिष्यपरंपरा,भारतीय संस्कृती, राष्ट्र विकास, समाज हित विविध उपक्रम माहिती दिली.शासन समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक वसा घेऊन राष्ट्रविकास ध्येय वाद व्यक्त केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. सी. सदावर्ते यांनी आपल्या मनोगतात गुरू गौरव , गुरू -शिष्यपरंपरा याबरोबर विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती व परंपरा जतन करण्याचे आवाहन केले. अनुगामी लोकराज्य महाअभियानांतर्गत गुरू गौरव कार्यक्रम अभियान प्रमुख प्रशांत कुंभार, सागर गायकवाड यांचे मनस्वी आभार मानले. महाभियान कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. यु.आर . पाटील यांनी मानले व सूत्रसंचालन श्री भरत नलवडे यांनी केले.


Comments
Post a Comment