चांदोली धरणाचे दरवाजे उघडलेः नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा.

चांदोली धरणाचे दरवाजे उघडलेः
नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा.

शिराळा -प्रतिनिधी.

चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या  पावसाचा जोर कायम असल्यामूळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत  असुन धरणाची पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी आज  दुपारी साडेबारा   वाजता चांदोली धरणाचे  चारीही वक्राकार  दरवाजे ०.५०    मीटरने उचलुन  धरणाच्या सांडव्यातुन  वारणानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यास  प्रारंभ करण्यात आला.सध्या धरणाच्या चारीही वक्राकार दरवाजातुन २८७० क्युसेक्स तर वीजनीर्मिती केंद्रातुन १६३० क्युसेक्स पाणी वारणानदीपात्रात सोडडण्यात आल्याने वारणानदिचे पाणी पात्राबाहेर पडले असुन चांदोली धरण प्रशासनाकडुन नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.चांदोली परीसरात पडणार्‍या पावसाचा जोर कायम असल्यामुळे या परीसरात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे  धरणाच्या पाणलोटक्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात  पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.सध्या धरणाची पाणी पातळी ६१९.२० मीटर इतकी आहे.तर धरणात सध्या २७ टि.एम सी म्हणजेच ७४.२२ टक्के पाणीसाठा  झाला आहे. परीसरात पडणार्‍या पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असुन नदिकाठची ऊस व भात शेती  पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नदिकाठच्या गावातील नागरीकांनी सावधानता बाळगावी अशा सुचनाही पाटबंधारे  विभागाकडुन देण्यात आल्या आहेत.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील खुंदलापुर,जाधववाडी,मणदुर,सोनवडे,आरळा,करुंगली,मराठेवाडीसह परीसरात संततधार  पाऊस कोसळत आहे .धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासात ५६  मिलीमीटर इतक्या पावसासह  आज अखेर धरणक्षेत्रात एकुण १२९२   मीलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .