भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश परिषदेवर संजय पवार व हर्षवर्धन मोहितेंची निवड
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश परिषदेवर संजय पवार व हर्षवर्धन मोहितेंची निवड.
कराड - प्रतिनिधी.
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश परिषदेवर कराड तालुक्यातील रेठरे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार व बेलवडे बु येथील कृष्णा सहकारी बॅकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते यांची निवड झाली. संजय पवार ,हर्षवर्धन मोहिते हे भा.ज.पा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांचे निष्ठावंत विश्वासु कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीने सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्या वतीने मलकापूर येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पदाधिकारी सुनिल शिंदे, शंकर पाटील, विस्तारक धनाजी माने,मध्यमंडलचे राजेंद्र यादव, पूर्वचे शंकर निकम, पश्चिमचे दत्तात्रय साळुंखे,सुरज शेवाळे,तानाजी देशमुख,शहाजी पाटील, सुर्यकांत खिलारे,कृष्णत तुपे,बापुराव थोरात, वसिम मुल्ला, रुपेश देसाई, श्रीकांत दमामे,याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले, मंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंञी जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,आमदार मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ,धैर्यशिल कदम, सत्यजितसिंह पाटणकर,कृष्णा कारखान्याचे चेअरमन डाॅ.सुरेशबाबा भोसले, विश्वस्त विनायक भोसले, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, जगदीश जगताप, प्रदिप डाईंगडे ,यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत तौफिक आगा यांनी केले आभार महेश पाटील यांनी मानले.

Comments
Post a Comment