आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या तत्परतेने धोकादायक विजेचे खांब हटविले.
आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या तत्परतेने धोकादायक विजेचे खांब हटविले.
उंडाळे -प्रतिनिधी.
महारुगडेवाडी ( ता.कराड.) येथील धोकादायक पोलची माहिती भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे व ग्रामस्थ यांचे मार्फत मिळाली .पोल पुर्ण जिर्ण झालेला होता, झाडामध्ये अडकलेला होता,या पोलच्या बाजुने जिंती-उंडाळे जाणारा रस्ता आहे.या डांबावरुन तीन ठिकाणी लाईटचा विस्तार झाला आहे. गावातील घरावरती पडण्याची भिती वर्तवली जात होती.या पोल मुळे गावात भितीचे वातावरण होते कार्यतत्पर आमदार डॉ.अतुलबाबा यांनी यांची दखल घेत लगेच MSEB विभागाशी संपर्क करुन, हा पोल बदलण्याचे आदेश देण्यात आले. या बदललेल्या पोल मुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महारुगडेवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीने मा.आमदार अतुलबाबाचे विशेष आभार मानण्यात आले.

Comments
Post a Comment