कराड R.T.O. च्या कामगिरीला फकिरा पँथर सेनेचा सलाम.

   कराड आर.टी.ओ च्या कामगिरीला फकिरा पँथर सेनेचा सलाम.

कराड - प्रतिनिधी.  

फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने कराड आर.टी.ओ.  अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कराड येथे R.T.O. कार्यालय मध्ये कामानिमित्त फकिरा पॅंथर सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अनिकेत भाऊ साळुंखे गेले असता एक प्रसंग अनुभवला.आर.टी.ओ. कार्यालय आवारात एक दिव्यांग व्यक्ती त्यांच्या कामानिमित्त आले होते. त्यांचे सदरचे काम दुसऱ्या मजल्यावर असावे. परंतु त्यांची अधिकाऱ्यांना माहिती मिळताच महिला अधिकारी  क्षणाचा विलंब न करता  मदतीला धावत तळमजल्यावर आल्या व त्यांचा प्रश्न मार्गी लावला. अधिकारी आपल्या भूमिका जबाबदारीने पार पाडत असतात. आज खऱ्या अर्थाने सुदृढ लोकशाहीचं दर्शन मला घडलं. नागरिकांनीही त्यांच्या कार्याचं  कौतुक केलं पाहिजे. कराड आर.टी.ओ.  चे काम सुद्धा अभिमानास्पद वाटलं अस मत फकीरा पॅंथर सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिकेतभाऊ साळुंखे यांनी व्यक्त केले. आम्ही या मानसिकतेला  फकिरा पॅंथर सेनेच्या वतीने आपले धन्यवाद करतो आणि आपल्या अश्या कार्याच्या पाटीशी कायम असू अशी ग्वाही दिली व या घटनेमुळे फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने कराड आर.टी.ओ. अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .