Posts

Showing posts from April, 2020
Image
महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण साधेपणाने ; फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात होणार कार्यक्रम सातारा दि. 29 ( जि. मा. का ) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय येथेच सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे. या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. इतर मान्यवरांना या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात येणार नाही तसेच कवायतीचे आयोजन करण्यात येणार नाही, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली.

कोरोनामुळे भारतीय समाजावर परिणाम कोणते होतील ?

Image
कोरोनामुळे भारतीय  समाजावर  परिणाम कोणते होतील ?   समग्र साधन संपत्ती निर्देशांकामध्ये असलेल्या स्थानाचा भारताला फायदा होईल का ? साळशिरंबे- प्रतिनिधी (प्रा.डॉ. विनोद कांबळे ) कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे भारताची त्याचबरोबर जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली दिसते त्यामुळे या परिस्थितीत भारतीय समाजावर कोणता परिणाम  होईल ?भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ? याबद्दल आत्तापासूनच समीक्षा करणे आणि त्यावरील उपाय योजने गरजेचे आहे.  कारण भारत हा समग्र साधन संपत्ती निर्देशांकांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये असलेला दिसून येतो (IWI REPORT 2012)आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारा मनुष्य बळ या जमेच्या बाजूच्या जोरावर भविष्यात भारत हा जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवू शकतो .  नुकत्याच या संघटनेने UNCTAD(United Nations Conference on Trade & Development ) जाहीर केलेल्या अहवालात भारताला  कोरोनामुळे अर्थव्यवस्थेमध्ये तोटा होईल या पद्धतीचं अनुमान काढलेला दिसून येत.         हा  अहवाल  आपण  नाकारला व आपल्या उपलब्ध साधनसंपत्त...
Image
गावपातळीवरील कृती समितीकडून वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कर्मचाऱ्यांना  सहकार्य करण्याचे  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन. सातारा दि. 25 (जिमाका) : राज्यात कोविड-19 या विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये या करिता ग्रामीण भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ग्रामपातळीवर राबविण्याची व पार पाडावयाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.  ग्रामणी भागामध्ये काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी अथवा वैद्यकिय क्षेत्राशी निगडित  काम करणारे सर्व कर्मचारी यांची त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणापासून कर्तव्याच्या ठिकाणी  जाणे-येणे होत आहे. अशा सेवक-सेविकांना गावामध्ये प्रवेश नाकारत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर गठीत गाव समिती, ग्रामस्थ यांनी कोणत्याही प्राकारचा अडथळा करु नये, उलट कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वैद्यकिय क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अत्यावश्यक बाबींकरीता पुरेसा वेळ देता येत नसल्याने, त्यांच्या द...
Image
निकट सहवासित 43 वर्षीय महिला कोरोना बाधित ; मृत 5 महिन्याच्या बालकासह 55 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह  13 वर्षाच्या मुलाचा अहवाल अनिर्णित तर 10 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल. सातारा दि. 23( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 43 वर्षीय महिलेचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  ही 43 वर्षीय महिला कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 14  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 8 व फलटण येथील 11 असे एकूण 55 रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे मृत झालेल्या 5 महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे. त...
Image
नांदगाव पोलीस ठाण्याच्या वतीने विभागात कोरोनासंदर्भात जनजागृती रॅली. "संचारबंदी व कोरोना संदर्भात जनजागृती रॅलीला नागरिकांच्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद "            ' गावागावांमध्ये रॅलीचे जोरदार स्वागत  ' ऊंडाळे - प्रतिनिधी (प्रदीप पाटील ) नांदगाव औट पोस्ट च्या वतीने जनजागृती अभियान. गावोगावी रांगोळी काढुन केले स्वागत. कोरोनो चा वाढता प्रसार रोखण्यासाठी कराड तालुका पोलीसांनी कंबर कसली आहे या मध्ये पोलीस अधीक्षक सुरज गुरव  व कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव औट पोस्ट व या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने  नांदगाव औट पोस्ट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव डांगे यांच्या माध्यमातून जनजागृती व सोशल डिस्टन्स सिंग  अभियान राबविण्यात आले. या परिसरातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव,  मनव, कालवडे, बेलवडे सह तब्बल सोळा गावात जनजागृती करण्यात आली तर मनव आणि नांदगाव येथे पोलीसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे महिलांनी औक्षण देखील केले. जनजागृती मुळे संचारब...
Image
ऊंडाळे सह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. " जोरदार गारपिटीसह वादळी पाऊस "  उंडाळे- प्रतिनिधी (प्रदीप पाटील ) ऊंडाळे सह कराड दक्षिण मधील डोंगरी भागात येवती, पाटीलवाडी, येळगाव महासोली, सवादे परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः दोन तास झोडपून काढले, उंडाळे परिसरात  शिवारात असणारी झाडे उखडुन पडली. अवकाळी पाऊसामुळे उंडाळे व परिसरातील  शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे  आहे,  सद्या या भागात मशागतीचे कामे सुरू आहेत नांगरणी करणे, शेणखत टाकणे, अशी कामे सुरू आहेत अशातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात चैतन्य निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणू ने अख्या जगाला वेठीस धरले आहे त्याचाच परिणाम राज्यात देखील आहे  गेल्या काही दिवसांपासून उंडाळे परिसरात देखील याचा परिणाम दिसला. या सर्व संकटांचा सामना करत जगाचा पोशिंदा मात्र आपल्या शेतीचे कामे करण्यात मग्न आहेत या पडलेल्या पावसामुळे मात्र एक प्रकारे शेतकऱ्यांना उर्जाच मिळाली आहे.परिसरात सर्वत्र शेती कामांना यापुढे वेग येईल.
Image
कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्त तरुण उपचारानंतर कोरोना मुक्त. " कराड मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये होते उपचार सुरू" कराड -(प्रतिनिधी )   कराड तालुक्यातील ३५वर्षीय युवकाला कोरोनाचा  संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते उपचारानंतर त्याचे कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले.
Image
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने  सॅनिटायझरचे वाटप. "   कोरोना ला प्रतिबंध घालण्यासाठी कारखान्याने केली स्वतः  सॅनिटायझर निर्मिती " साळशिरंबे -( प्रतिनिधी ) कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेशरावजी भोसले(बाबा) व संचालक मंडळ यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत  सॅनिटायझर निर्मिती सुरू केली व आपल्या कार्यक्षेत्रात  शेतकरी, सभासद व नागरिकांना मोफत  सॅनिटायझरच वाटप केलं.    याच पार्श्वभूमीवर मा.डॉ.सुरेशजी भोसले (बाबा) चेअरमन य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने, साळशिरंबे गावातील सभासद व शेतकरी यांना मोफत सैनिटाइजर वाटप करण्यात आले.         यावेळी भाजपा युवा मोर्चा कराड तालुकाध्यक्ष श्री.पंकज पाटील, माजी उपसरपंच श्री.वसंत मोहिते, कृष्णा कारखाना चिटबॉय श्री.गणेश पाटील, वि.का.स.सेवा सोसायटी सदस्य श्री.वासुदेव पाटील, श्री.जयकर ...
Image
उंडाळे पोलीस ठाण्याच्यावतीने कोरोना व संचारबंदी बद्दल जनजागृती रॅली. "उंडाळे विभागातील पोलीस पाटील संघटनेचाही या जनजागृती रॅलीमध्ये सहभाग " उंडाळे -प्रतिनिधी (प्रदीप पाटील)  कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने संचारबंदीत वाढ केली या पाश्वभुमीवर उंडाळे परिसरातील उंडाळे पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये संचारबंदी पालन  करण्यासाठी  व सोशन डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी  जनजागृती रँली आयोजन करण्यात आले. उंडाळे परिसरात नागरिकांसाठी या कायद्याविषयी माहिती नसल्याने . त्यामुळे अनेकांकडून संचारबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र पोलिसांनी कधी दंडुक्यांचा वापर करत तर कधी प्रेमाने नागरिकांना समजावून सांगत २१ दिवसांची संचारबंदी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर राज्यात संचारबंदीत वाढ झाल्याने त्या पाश्वभुमीवर उंडाळे विभागातील सर्व गावातील पोलीस पाटील यांच्या सहयोगाने उंडाळे औट पोस्टच्या उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंडाळे, येळगाळ, येवती भूरभुशी येणपे, साळशिंरबे, जिंती टाळगाव, म्हासोली,पाटीलवाडी विभागातील ग...
Image
सातारा जिल्ह्यासाठी अत्यावश्यक वाहतुकीला ऑनलाइन पास देण्याची सुविधा उपलब्ध. " लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सुविधा करणाऱ्यांना वाहतूक पास मिळणार " ' नागरिकांच्यात असलेले वाहन परवाना विषयीचा संभ्रम दूर होणार' साळशिरंबे - प्रा.(डॉ) विनोद कांबळे  कोरोना वायरसला प्रतिबंधक उपाय म्हणून  भारतभर  लॉकडाउनचा निर्णय घेतला या निर्णयामध्ये फक्त आवश्यक सेवा सुविधा लोकांना उपलब्ध राहणार आहेत. या सेवा सुविधा पुरवणाऱ्या लोकांच्या वाहनांना परवाना देण्यासाठी आता सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे .             covid 19.mpolice.in या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना अत्यावशक सेवा सुविधा पुरवणे वाहनांना  परवाना देण्यात येत होता पण त्या ठिकाणी सातारा जिल्हा हा ऑप्शन येत नसल्यामुळे गैरसोयीचे होत होता पण ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित सातारा जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे .  http://satarapolice.techcubesolutions.in/UserDashboard.aspx या संकेतस्थळावर सातारा जिल्ह्यासाठी अत्यावश्यक सेवा सु...
Image
 लाँकडाऊन  काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्याचा वाहनांना ऑनलाइन पास देण्याची सुविधा उपलब्ध . "  प्रशासनाने दिलेल्या या सुविधांच्या मुळे रस्त्यावर विनाकारण फिरणावर येणार चाप" 'संपूर्ण  राज्यासाठी ही ऑनलाइन पास सुविधा उपलब्ध आहे ' साळशिरंबे -(विनोद कांबळे)   देशभरात कोरोना व्हायरसला प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण देशभरात लॉक डाउन सद्य चालू आहे या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांना वापरणे येणाऱ्या वाहनांना ऑनलाइन पास देण्याची सुविधा सुविधा covid19.mpolic.in या संकेतस्थळावर  सुरू आहे.   यामुळे त्या संकेतस्थळावर पास काढताना तुम्हाला तुमच्या अत्यावश्यक सेवा सुविधांची तपशील देन गरजेच आहे. जर तुमची कागदपत्र जर वैद्य ठरली गेली तर त्या ठिकाणी तुमच्या अत्यावश्यक सेवेसाठी तुम्हाला वाहन परवाना उपलब्ध होणार आहे. सद्य परिस्थितीमध्ये बरीच वाहने संभ्रमित वहान पास परवाना घेऊन रस्त्यावर फिरताना आढळतात त्यामुळे नागरिकांच्यात   भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.         सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या मध्ये या ऑनलाईन वाहन परवाना...
Image
उंडाळे ग्रामपंचायतीकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक  उपाय म्हणून संपूर्ण गावात  ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी. " परिसरातील  बाजारपेठेचे व इतर सुविधांच  मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ग्रामस्तरीय कमिटींन  घातलं विशेष लक्ष" उंडाळे-प्रतिनीधी (प्रदिप पाटील) कोरोना वायरसची भीषणता दिवसेंदिवस वाढतच आहे, कारोना विषाणू्चे गांभीर्य लक्षात घेता कुणालाही लागण होवू नये म्हणून तसेच कोरोना विषाणूपासून गावातील कोणत्याही नागरिक संक्रमित होऊ नये यासाठी उंडाळे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,  कर्मचारी मार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.      ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात ट्रँकटरद्वारे संपुर्ण गावात दि. ९रोजी गुरुवारी १००लिटर   सोडियम हायड्रो क्लोराईड  सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. उंडाळे गावात प्रत्येक वार्ड, व गल्लो-गल्ली ट्रॅक्टरने फवारणी करण्यात आली यावेळी   सरपंच दादासो पाटील, सदस्य बापुराव  पाटील  स्वःत हजर राहुन  फवारणी केली. तसेच संपूर्ण गावांमध्ये घरोघरी जाऊन फवारणी चे विषयी  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां द्व...
Image
भारतीयांची  सामाजिक बांधिलकीच कोरोनावर  मात करू शकते . " समाजातील सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, क्षेत्रातील लोकांनी समाज जागृती करण गरजेच. ग्रामीण भागात अजूनही कोरोना संसर्गजन्य रोगांबद्दल माहिती कमीच.   साळशिरंबे - प्रा.(डॉ)विनोद कांबळे. संपूर्ण भारतभर कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेल्या आपल्याला दिसून येतं भारतीयांच्या मध्ये असणारी सामाजिक बांधिलकी हीच या संसर्गजन्य रोगांपासून भारताला बाहेर काढू शकते .त्यासाठी उपचारापेक्षा प्रतिबंधक हा उपाय श्रेष्ठ मानून राजकीय, शैक्षणिक ,सामाजिक ,क्षेत्रातील लोकांनी  कोरोना विषयी जनजागृती करून कोणाला प्रतिबंध घालण्यासाठी लोकचळवळ चालवावी . कोरोणावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने सध्या प्रसार थांबवणे  एकमेव उपाय ठरलेला आहे. त्यासाठी आजाराबद्दल त्याच्या होणाऱ्या संसर्गा बद्दल तो संसर्ग कसा होतो याबद्दल समाजात जागृती होणे गरजेचे आहे. कारण भारत हा खेड्यात वसलेला आहे. अर्थार्जनासाठी लोक शहराकडे स्थलांतर करतात पण त्यांचे बरेच कुटुंबीयही ग्रामीण भागातच वास्तव्यास असतात. ग्रामीण भागामध्ये सामाजिक विलगीकरणा ला फार मोठ्...
Image
कराड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण. उंडाळे परिसरातील महारूगडेवाडी येथे कोरोना बाधित दुसरा रुग्ण. उंडाळे-प्रतिनिधी( प्रदीप पाटील ) तांबवे ता.कराड नंतर उंडाळे परिसरातील महारूगडेवाडी येथे कोरोना बाधित दुसरा रुग्ण आज (दि.७) रोजी आढळुन आला असुन तालुका वैघकीय अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी ही माहिती दिल्या नंतर उंडाळे व परिसरात सक्त लाँक डाऊन लागु करण्यात आला.   तांबवे नंतर कराड तालुक्यातील महारूगडेवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.   याघटने नंतर प्रशासनाकडुन खबरदारी घेत उंडाळे सह परिसरात कडक पावले उचलत उपाय योजना राबवल्या असुन   महारूगडेवाडी परिसर  सील करण्यात आला आहे.संबधित बाधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली असणाऱ्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून गावात सर्वे सुरू असून घरोघरी जाऊन माहिती घेतली जात आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेताना त्रास होत असेल अशा व्यक्तींची यादी स्वतंत्र तयार करण्यात येत आहे. संबंधित बाधित व्यक्ती मुंबईहून गावी आली असून...
Image
ग्रामीण भागात किराणा दुकानदाराकडुन , सर्वसामान्यांची लुट. दुप्पट भावाने वस्तु विक्री: प्रशासनाकडुन कारवाईची गरज. उंडाळे -प्रतिनीधी(प्रदिप पाटील)      जगभरात कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा सुरु आहे.  या परिस्थितीचा फायदा घेऊन वस्तूंची चढ्या भावाने विक्री सुरु आहे. कराड दक्षिण मधिल बहुतांश ग्रामीण भागात किराणा मालाची चढ्या दराने विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.  बहुतांश किराणा दुकानात मूळ किंमतीपेक्षा अधिक दराने किराणा मालाची विक्री सुरु आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. खाद्य तेलाची किंमत ८२ रुपया पर्यंत असताना त्याची विक्री ९८-१०० रुपये प्रती किलोप्रमाणे होत असल्याचे दिसून आले. जवळपास २० टक्के अधिक दराने विक्री चालु असल्याचे दिसून येत आहे. ‘लॉक डाऊन’ व महाराष्ट्र राज्यात संचारबंदी आहे. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे की जनतेने कसलीच परवा न करता घरात रहावे जेणेकरून त्या...
Image
अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या शिवाय इतर लोकांच्या गाड्यां मध्ये पेट्रोल येतेच कसे ?    ओळखपत्र धारकांकडून होतोय चुकीचा वापर ? प्रतिनिधी- अमित शिंदे            देशभर वेगाने  वाढत असलेल्या कोरोना साथीला मुकाबला करण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना चालू आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अतोनात प्रयत्न सुरू केले आहेत देशातील तसेंच राज्यातील सरकार ने लॉकडाउन घोषित केला आहे त्यामुळे फ़क्त आवश्यक सर्व सेवा चालू ठेवल्या आहेत त्या मध्ये सर्व कर्मचारी दिवस रात्र कष्ट घेत आहेत परंतू त्यातील काही कर्मचारी मात्र आपल्या ओळखपत्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे दिसून येत आहेत पेट्रोल पंपा वरती फक्त अत्यावश्यक सेवेतीलच लोकांना पेट्रोल दिले जात असताना रोड वरती इतर नागरिकाच्या गाड्या फिरताना दिसत आहेत अत्यावश्यक सेवेतली लोक कामासाठी  फिरणे सहाजिकच आहे. परंतु  अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त विना कामी  रोड वरती चकरा  मारण्याची संख्या वाढत आहे अत्यावश्यक सेवेतील लोक तर आपापल्या कामात व्यस्त असताना रोड वरती फिरणाऱ्या गाड्यांमध...
Image
शासकीय तंत्रनिकेतन कराड येथील विद्यार्थ्यांना धान्य वाटप. तिरंगा रक्षकचे संपादक विश्वासराव मोहिते,राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष समीर पटेल. कराड -(प्रतिनिधी) कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अरुणाचल प्रदेश येथील विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुट्या सुरु झाल्यानंतर घरी परतण्यापूर्वी संचार बंदी घोषित झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती यावेळी जनजागृती सामाजिक संस्था, कराड आणि समीर पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य देण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष,तिरंगा रक्षकचे संपादक विश्वासराव मोहिते,राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व विध्यार्थी.
Image
साळशिरंबे येथे स्वस्त धान्य लाभार्थी नागरिकांच्या घरपोच. " ग्रामस्तरीय कमिटीकडून कार्यवाही ,सरपंच पोलीस पाटील, उपस्थित " 'कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ग्रामस्तरीय कमिटीकडून या पद्धतीचा अवलंब ' साळशिरंबे -(प्रतिनिधी)  कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी भारतभर केलेल्या उपाययोजनांमध्ये सोशल डिस्टन्ससिंग  हा प्रतिबंधक उपाय केला जात आहे याचप्रमाणे साळशिरंबे  गावातही स्वस्त धान्य दुकान वाटप केंद्राच्या मार्फत स्वस्त धान्य वाटप हे प्रत्येक लाभार्थीचा घरी जाऊन केलं जात आहे.     कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकांना खबरदारी घेतलेली दिसून येते. प्रत्येक ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवून स्वस्त धान्य दुकान तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वितरण केलेल आपल्याला दिसून आलं  पण साळशिरंबे गावांमध्ये  चक्क स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थींच्या घरपोच धान्य पोहोचवले . ग्रामस्तरीय कमिटीकडून हि  युक्ती लढवली गेली. यावेळी ग्रामस्तरीय कमिटी अध्यक्ष, सरपंच तात्यासोा पाटील , उपाध्यक्ष तलाठी यांचे प्रतिनिधी उत्तम साळुंखे  , या कमिटीच्या सदस्या गावच्या...
Image
मॅग फायनान्स कंपनी ने जपली सामाजिक बांधिलकी. " कोरोना या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्यासाठी  महिला बचत गटांना केले मास्कचे वाटप"  उंडाळे- प्रतिनिधी (प्रदीप पाटील ) सध्या पूर्ण जगाला कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणू ने वेठीस धरले आहे त्याचा सामना करण्यासाठी आपल्या देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे कोरोनो ला रोखण्यासाठी दिवसरात्र आपले  प्रशासन , वेगवेगळ्या सेवाभावी संस्था काम करत आहे असुन जगासमोर सध्या उभे ठाकलेल्या संकंटाचे रौद्र धारण केले त्या संकंटावर मात करण्याची आपली सामाजिक जबाबदारी असल्याची जाण ठेवत त्याच  अनुषंगाने मॅग फायनान्स कंपनी ने सामाजिक बांधिलकी जपत येवती ता कराड महिला बचत गटांच्या काही महिलांना मास्क चे वाटप करण्यात आले आणि सोशल डिसटेनस चा वापर करून मास्क वाटप करण्यात आले या वेळी कंपनी चे प्रॉडक्ट मॅनेजर ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले कंपनीच्या संचालक मंडळाने नेहमीच सामाजिक कार्यास अग्रेसर राहुन काम केले आहे माणुस म्हणुन जन्माला आल्यावर आपणही समाजाला काही तरी देनं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून क...
Image
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना करणार हॅन्ड सॅनिटायझर्सची निर्मिती.  सातारा जिल्ह्यात  सॅनिटायझर निर्मिती करणारा कृष्णा  पहिला  कारखाना- डॉ. सुरेशबाबा भोसले. कराड -(प्रतिनिधी) कोरोना व्हायरसच्या रुपाने सबंध जगावर किंबहुना देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी कराड तालुक्यातील रेठरे शिवनगर येथील य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याने नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून  हॅन्ड सॅनिटायझर्सची निर्मिती करण्याचे जाहिर केले . राजकिय ,सामाजिक ,सहकार ,क्षेञात दबदबा असणार्‍या कराड तालुक्यातील भोसले कुटूंबाच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा समुहाने नेहमी  सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे क्रांतीकारक निर्णय घेतलेले आहेत. कारखान्यामध्ये निर्माण होणार्‍या हॅन्ड सॅनिटायझर्स सर्व प्रथम कारखान्याच्या सभासदांना घरपोच मोफत वाटप करण्यात येईल असे डाॅ. सुरेशबाबा भोसले यांनी सांगितले, कृष्णा कारखान्यामुळे सर्वसामांन्य शेतकर्‍यांचे जिवनमान उंचावले आहे. कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाला विक्रमी दर देण्यासोबत शेतकरी हिताचे निर्णय देखील घेतले आहे. कारखान्याचे कार्...
Image
साळशिरंबे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण . "कोरोना या साथीच्या  रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण गावात औषध फवारणी केली."  साळशिरंबे - (प्रतिनिधी)  संपूर्ण जगभर कोरोना या साथीच्या रोगांना थैमान घातलेले आहे. भारतातही या कोरोनाने  सर्व राज्यांमध्ये  संसर्ग होत आहे या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी शहर तसेच ग्रामीण भागातही प्रतिबंधक उपाय केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर साळशिरंबे ग्रामपंचायतीच्या वतीने  कोरोना यासाठीच्या रोगाविषयी जनजागृती तसेच  संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात आली . यावेळी सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. औषध फवारणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी.