बीआरएसपी तर्फे जंतर मंतर वर धरणे आंदोलन.
बीआरएसपी तर्फे जंतर मंतर वर धरणे आंदोलन. मुंबई : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर मणिपूर येथील हिंसाचार आणि आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतर येते धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धसदृश्य परिस्थितीत तातडीने नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.डॉ. सुरेश माने यांनी केले, या आंदोलनात आसामचे लोकसभा खासदार सरनिया, सीपीआयचे केंद्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, आर एस पी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, दुसरे राष्ट्रीय उपाध्यक्ष हिमाचल प्रदेशचे निवृत्त डीजीपी पृथ्वीराज, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र कुमार, राष्ट्रीय महामंत्री ॲड दिनेश राजभर, दिल्ली विद्यापीठातील प्रो.रतनलाल आदी उपस्थित होते, यावेळी मनिपुर मधील महिला अत्याचाराच्या घटना व चिंता व्यक्त करण्यात आली याप्रसंगी बोलताना ॲड.डॉ. सुरेश माने यांनी मोदी सरकारच्या बहुजन समाज विरोधी धोरणावर सडकून टीका केली, ते म्हणाले की, मोदी सरकार का नव वर्षाचा कलात बहुजन समाज विरोधी धोरण ...