कोडोली हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
कोडोली हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
कार्वे प्रतिनिधी:-
भारती विद्यापीठ च्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली येथील शाळेमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात व्यास ऋषींचा प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीतील विद्यार्थिनी कु.अस्मिता पाटील व कु. प्राची पाटील यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक गुरुवर्य यांचे श्रीफळ व फुल देऊन स्वागत करण्यात आले.इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमे विषयी भाषणे केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक मोरे आय.जे. होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. जाधव व्ही.ए. यांनी केली. तसेच मनोगत श्री.आंबी एस.ए. व श्री.पाटील पी.एस. यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार सौ.संदे एस. ए. यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment