सौ. वैशाली पाटील यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेकडून गौरव.
सौ. वैशाली पाटील यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेकडून गौरव.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे, कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म ) घोगाव. महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. वैशाली अमर पाटील यांना एप्रिल 2023 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अभियांत्रिकी विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ही संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केले व त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसून जोहरी सर, सर्व युनिटचे प्राचार्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment