कृष्णा’चे शेतकरी ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना.

 ‘कृष्णा’चे शेतकरी ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना.


शिवनगर, ता. १० : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ३२ शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी शिबीरात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ३२ शेतकर्‍यांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

यावेळी संचालक बाजीराव निकम,  जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, कार्यालयीन अधीक्षक निलेश देशमुख, वाहतूक अधिकारी गजानन प्रभुणे, संरक्षण अधिकारी संजय नलवडे आदी उपस्थित होते. 

चार दिवसीय प्रशिक्षण शिबीरात सांगली, सातारा, मराठवाडा व खानदेशमधील हजारो शेतकरी सहभागी होत असतात. शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मान्यवरांनी प्रशिक्षणास रवाना होणाऱ्या शेतकरी सभासदांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व अधिकारी, सर्कल ऑफिसर, शेती मदतनीस व कर्मचारी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .