सागाव ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा.
सागाव ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा.
शिराळा - प्रतिनिधी.
सागाव ग्रामपंचायतवर महिलांचा मोर्चा.सागाव मधील वा.नं.३मधील शिराळा रोडवरील पेट्रोल पंपाशेजारील गुंगामामा काँलनीमध्ये रस्ता,नाले,वीज व पाणी या सुविधा मिळाव्यात म्हणून काँलनीमधील सर्व महिलांनी सागाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला .त्या वेळी सर्व महिलांनी सागावच्या महिला सरपंच सौ.अस्मिता रवि पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये पावसाळ्याच्या दिवसात रस्ता चिखलमय होऊन फार मोठ्या प्रमाणात पाणी साठून रहात आहे. त्यामुळे आरोग्य व अपघात यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
काँलनीमधील २०आर सी सी घराची घरपट्टी च्या स्वरूपात कर भरला जातो तर ग्रामपंचायती कडून रस्ता, नाला,वीज,पाणी या सुविधा मिळणे हा तेथील रहिवाशांचा हक्क आहे. याची मागणी केली ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही तर या महिला तहसीलदार, बीडीओ,कलेक्टर यांना देखील निवेदन देणार इशारा दिलाय. निवेदन सादर करताना श्रीमती विनोदिनी मोहिते, श्रीमती विजया पाटील, सौ.अनिता पाटील,सौ.धनश्री पाटील.,सौ.सखुबाई पाटील, व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Comments
Post a Comment