बीआरएसपी तर्फे जंतर मंतर वर धरणे आंदोलन.


 बीआरएसपी तर्फे जंतर मंतर वर धरणे आंदोलन.

मुंबई : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर मणिपूर येथील हिंसाचार आणि आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात  दिल्ली येथील जंतर-मंतर येते धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धसदृश्य परिस्थितीत तातडीने नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.डॉ. सुरेश माने यांनी केले, या आंदोलनात आसामचे लोकसभा खासदार सरनिया, सीपीआयचे केंद्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, आर एस पी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, दुसरे राष्ट्रीय उपाध्यक्ष हिमाचल प्रदेशचे निवृत्त डीजीपी पृथ्वीराज, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र कुमार, राष्ट्रीय महामंत्री ॲड दिनेश राजभर, दिल्ली विद्यापीठातील प्रो.रतनलाल आदी उपस्थित होते,

यावेळी मनिपुर मधील महिला अत्याचाराच्या घटना व चिंता व्यक्त करण्यात आली याप्रसंगी बोलताना 

ॲड.डॉ. सुरेश माने यांनी मोदी सरकारच्या बहुजन समाज विरोधी धोरणावर सडकून टीका केली, ते म्हणाले की, मोदी सरकार का नव वर्षाचा कलात बहुजन समाज विरोधी धोरण अवलंबीले आहे. मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या भयानक घटना वर पंतप्रधान मोदी चाकर शब्द काढत नाही. बहुजन समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही समस्याग्रस्त आहे. प्रचंड बेरोजगारी शेतकरी आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, प्रचंड महागाई  ने जनता त्रस्त झालेली आहे, अशी टीका का त्यांनी केली.

याशिवाय खासदार सरानिया, प्रो. सलमान, दिल्ली युनिव्हर्सिटी चे प्रा. लाल यांनीही आपल्या भाषणातून केंद्र सरकारवर टीका केली, त्यानंतर बी आर एस पी तर्फे राष्ट्रपतीच्या नावे निवेदन देण्यात आले आंदोलनात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .