बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने चेंबूर येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १४९ वी जयंती उत्साहात साजरी.


  लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १४९ वी जयंती उत्साहात साजरी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांची प्रमुख उपस्थिती. 

मुंबई: प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने चेंबूर येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १४९ वी जयंती उत्साहात साजरी. यावेळी डाॅ.सुरेश माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.सुरेश माने यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी देवू केलेल्या आरक्षणासंदर्भात असलेली विकासाची भूमिका स्पष्ट केली.
आज मराठा समाज हा त्यांच्या मुलभूत आर्थिक विकासासाठी आरक्षण मागत असले तरी स्वातंत्र्यापूर्वी स्वतंत्र म्युनिसिपलमथ्ये राखीव मतदारसंघ होते, त्यामधून मराठा स्वतंत्र मतदारसंघातून विठ्ठल रामजी शिंदे हे निवडून गेले होते, मुस्लीम मतदारसंघातून बॅरिस्टर जीना तर मागासवर्गीय मतदारसंघातून डी.डी.घोलप निवडून गेले होते, अशी माहिती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष डाॅ.सुरेश माने यांनी येथे बोलताना दिली.
       बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने चेंबूर येथील पी.एल.लोखंडे मार्गावर मातोश्री सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर साहित्यिक आनंद म्हस्के, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दिनेश राजभर, बबन कांबळे, मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले, पत्रकार महादू पवार आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, जयंती चे औचित्य साधून चेंबूर येथील निवडक धार्मिक सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिलेल्या अनेकांचे सन्मान तसेच विद्यार्थी वर्गाला वही पेन देवून गौरविण्यात आले.
       यावेळी डाॅ. माने म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांची १५० जयंती साजरी करावी लागणार आहे. कोल्हापूर संस्थानातून शाहूराजे यांनी आदर्श राज्यकारभार केला. गुन्हेगारी कायदा मोडीत काढून भटके विमुक्त समाजाला मुक्त केले. शाळांना मान्याता देवून गाव तिथे शाळा धोरण राबविले. भूमिहीनांना जमीन दिली.राधानगरीत धरण बांधले, एवढेच नव्हेतर मागासवर्गीय यांना पहिले आरक्षण धोरण त्यांनीच राबविले. दलित असलेल्या गंगाराम कांबळे यांना पहिले हाॅटेल टाकून देवून स्वत चहा प्यायला जात असत, असा लोकहितवादी राजा होणे, हे दुर्मीळच म्हणावे लागेल. आज महाराष्ट्रात अत्याचार झाले की ,आंबेडकरी चळवळीतील काही जण चार, पाच दिवस आक्रोश करतात दलितांचे प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकारे जातीयवाद उभा करणे चुकीचे असे ही डॉ.माने यांनी सांगितले. त्यानंतर शांत होवून जातात. ही बाब चळवळीसाठी घातक असल्याची खंत डाॅ.सुरेश माने यांनी बोलताना व्यक्त केली. आपले विधानसभेत भांडणारे चार, पाच आमदार निवडून पाठवून द्या, मग बघा परिवर्तन कसे होईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील साडे पाच लाख गायरान धारकांचा लढा आम्ही लढतो आहोत. त्यांना मालकी हक्काच्या जमिनी देण्याच्या सरकारी निर्णयाचे काय झाले,असा सवाल ही त्यांनी केला आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे मुंबईत निधन झाल्यानंतर त्यांची त्याच सायंकाळी मद्रासमध्ये शोकसभा झाली.याचा अर्थ शाहू महाराज यांचे कार्य देशव्यापी होते, हे सिध्द होते. कांशीराम यांनी कही हम भूल नही जाये, या कार्यक्रमा अंतर्गत शाहू महाराज यांची एक आठवडा जयंती कोल्हापूरात तीन लाख लोकांच्या उपस्थितीत साजरी केली. उत्तर प्रदेशात कानपूर येथे शाहू महाराज यांचे पाचशे एकर जमिनीवर भव्य स्मारक उभारुन त्यांचा सन्मान केला,अशी माहिती डाॅ.सुरेश माने यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले यांनी केले, नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले यांचा जाहीर सत्कार डाॅ.सुरेश माने यांनी केला, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत पक्ष पदाधिकारी आणि स्थानिकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .