कोडोली हायस्कूलमध्ये गायत्री रायते हिचा सत्कार.
कोडोली हायस्कूलमध्ये गायत्री रायते हिचा सत्कार.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता. कराड येथील भारतीय विद्यापीठचे हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेची माजी विद्यार्थिनी कु. गायत्री ज्ञानदेव रायते हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक या पदावर निवड झाल्याबद्दल तिच्या शाळेमध्ये सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुमारी गायत्री ज्ञानदेव रायते हिचा सत्कार सरपंच सौ. मीनाक्षी जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी कु. गायत्री रायते हिने इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, शालेय जीवनात तुमच्या मित्र मैत्रिणी तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात. कोणतेही यश संपादन करण्यासाठी ध्येय निश्चित करावे .आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित व्हावे लागते . तरच यश मिळू शकते . त्यासाठी विद्यार्थ्यांनी खुप अभ्यास करा ध्येय निश्चित करा तुम्ही परीक्षेत उत्तम यश संपादन करू शकता. या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षक श्री. मोरे आय.जे. यांनी केले. तसेच सूत्रसंचालन सौ.संदे एस. ए. यांनी केले. तर आभार श्री.आंबी एस.ए. यांनी व्यक्त केले .
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रामपंचायत सदस्य संदीप होनकळसे, विक्रम थोरात पोलीस पाटील सुधाकर जगताप, अशोक मोरे, शरद जगताप तसेच पालक कोडोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments
Post a Comment