कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयास सर्वोत्तम श्रेणी प्रधान.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयास सर्वोत्तम श्रेणी प्रधान.

उंडाळे - प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे, कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म ) घोगाव. या महाविद्यालयास वर्ष 2022- 23 मध्ये सर्वोत्तम श्रेणी प्रदान करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी दिली.

या महाविद्यालयास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली या सर्वोच्च केंद्रीय संस्थेचे व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांची मान्यता आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास भेट देऊन शैक्षणिक कामकाज, पायाभूत सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, महाविद्यालयाचा निकाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, शिक्षक वर्ग  यांची पाहणी व छाननी करून महाविद्यालयात 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी सर्वोत्तम श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. या यशामध्ये संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसून जोहरी सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम  शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी यांचे विशेष योगदान लाभले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .