विज्ञान शिक्षक 'इन्स्पायर ॲवार्ड ' कार्यशाळेमुळे नोंदणीसाठी झाले सज्ज.

 विज्ञान शिक्षक  'इन्स्पायर ॲवार्ड ' कार्यशाळेमुळे नोंदणीसाठी झाले सज्ज.

कराड प्रतिनिधी:- ( प्रविण पाटील) यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायंन्स कॉलेज सातारा येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित इन्स्पायर ॲवॉर्ड कार्यशाळा उत्साहात पार पडली.विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त उपकरणांची राज्य पातळीवर निवड होण्यासाठी तसेच सन 2023-2024 नामांकने भरण्यासाठी जिल्हयातील सर्व उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विज्ञानप्रेमी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शिक्षणाधिकारी(माध्यमिक) सौ प्राभावती कोळेकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच उपशिक्षणाधिकारी  श्री गंबरे साहेब आणि शिक्षण विस्तार अधिकारी सौ.मायावती शिंदे यांनी  6 वी ते 10 वी मधील चांगल्या पाच संकल्पना ३१ ऑगष्ट पूर्वी ऑनलाईन वेब साईट वरून किंवा इनस्पायर मानक ॲप वरून नोंद करण्याविषयी विज्ञान शिक्षकांना आव्हान केले.

जिल्हा प्रसारक श्री लक्ष्मण उबाळे श्री कोटेश्वर विद्यालय,गोवे.यांनी संकल्पना कशा असाव्यात याचे मार्गदर्शन केले.तसेच INSPIRE MANAK ॲप च्या मदतीने आपल्या मोबाईल मधून कशा पध्दतीने नामांकने भरता येतात हे अॅप कसे उपयोगी आहे याविषयी स्वत: बनविलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून  लाईव्ह  पध्दतीने डेमो दाखवून सविस्तर माहिती दिली. सातारा जिल्हा इन्स्पायर ॲवार्ड मध्ये कायम पहिल्या क्रमांकावर आहे.जिल्हयातील परखंदी हायस्कूल परखंदी शाळेतील यश शिंदे या विद्यार्थ्यांने देशात गोल्ड मिडल मिळवले. हीच परंपरा कायम ठेवून या वर्षी सुध्दा जास्तीत जास्त नामांकन करण्याचे आव्हान श्री लक्ष्मण उबाळे यांनी केले.

सैनिक स्कूल सातारा येथील श्री शिवप्रसाद टिंगरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या आयडीया कशा असाव्यात तसेच आयडीया स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करुन त्यामधील पाच चांगल्या संकल्पना कशा निवड कराव्यात या विषयी पी.पी.डी च्या मदतीने सविस्तर माहिती दिली. परखंदी हायस्कूल परखंदी चे श्री प्रसाद यादव सर यांनी यश शिंदे या विद्यार्थ्याचे उपकरण देशात पहिल्या क्रमांक कसे आले या विषयी आपले अनुभव कथन केले.या कार्यशाळेसाठी सूत्रसंचलन श्री सचिन पंडित सर जि.प.प्राथमिक शाळा काळज यांनी केले.शेवटी विज्ञान मंडळाचे सचिव श्री सागर जाधव न्यू इंग्लिश स्कूल राजापूरी यांनी आभार व्यक्त केले.








**********************************************

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न.







Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .