कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रमाचे आयोजन.
कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रमाचे आयोजन.
सातारा दि. 14 (जिमाका) : कृषि निविष्ठा विक्रेत्यांकरिता कृषि पदविका (Diploma in Agricultural Extension Services for Input Dealers DAESI) अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम राबवून भविष्यामध्ये अशा प्रशिक्षित विक्रेत्यांकडून पॅरा एक्स्टेंशन वर्कर म्हणून त्यांच्या मार्फत इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यास मदत होणार आहे. याअनुषंगाने भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय कृषि विस्तार प्रबंधन संस्था, मॅनेज हैद्राबाद यांचे मार्फत कृषि निविष्ठा परवानाधारक यांचे करिता एक वर्षीय पदवीका अभ्यासक्रम सुरु केले आहे.
ज्या कृषि निविष्ठा परवानाधारक विक्रेत्यांचे कृषिविषयी आवश्यक शिक्षण झाले नसेल अशा विक्रेत्यांसाठी सदरचा अभ्यासक्रम अनिवार्य आहे. त्यामुळे सदरचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास संबंधित विक्रेत्यांचा कृषि निविष्ठा परवाना रद्द होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील संबंधित निविष्ठा विक्रेत्यांस भविष्यात निविष्ठा पुरवठा करण्यास अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा अभ्यासक्रम 48 आठवड्याचा असून यात 40 आठवडे वर्गातील सत्र व 8 क्षेत्रीय भेटी आहेत. आवश्यक पात्रता- कृषि निविष्ठा विक्रीचा परवाना, फी रक्कम रू. 10 हजार (कृषि निविष्ठां विक्रेत्यांसाठी) जिल्हयामध्ये अभ्यासक्रम राबविणेसाठी मॅनेज हैद्राबाद हा यांनीदखालीलप्रमाणे Nodal Training Institute (NTI) संस्थांना मंजुरी दिलेली आहे.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण- श्री. अमोल रणावरे- 9423967567, मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान, राजमाची, ता. कराड –श्री.ए.एल. काटकर-9158889386, सेवा (Society for Empowerment of Village & - श्री. कृष्णा शिपकुले- 8999304565,सातारा कृषि विज्ञान केंद्र, कालवडे, ता. कराड- श्री. बी. एस. खांडेकर-9423529137,-कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, फलटण, ता. फलटण- श्री.एस.एस. आडत- 9970280528,आरती संस्था (अँप्रोपिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिटयूट) फलटण- श्री. प्रसाद बडवे- 9226156489
जिल्हयातील 6 प्रशिक्षण संस्थामध्ये अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्हयातील परवानाधारक कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी अभ्यासक्रमासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले आहे.


Comments
Post a Comment