कै. शरद लाहीगडे मित्रपरिवाराने जपली सामाजिक बांधिलकी.

 कै. शरद लाहीगडे मित्रपरिवाराने जपली सामाजिक बांधिलकी.

कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)

कै. शरद लाहीगडे (अण्णा) मित्रपरिवार याच्यातर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत तरी सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपल्या भागात ऊस तोडी निम्मित येणाऱ्या ऊसतोड मजूर यांची देखील दिवाळी गोड व्हावी या हेतूने ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करणेत आले. 

तसेच आपल्या भागातील रुग्णासेवेत काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांना साडी व मिठाई वाटप, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार बांधव यांना शर्ट व मिठाई वाटप व पोलीस बांधवाना मिठाई वाटप करणेत आले.तरी गरजू व समाजासाठी काम करणाऱ्या नागरिकांकरिता दिवाळीनिम्म्मीत एक सामाजिक बांधिलकीच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक मा श्री. अतुल लाहीगडे (भाऊ) यांनी दिली.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य  माननीय .श्री. अतुल लाहीगडे (भाऊ), बंडासो देशमुख (दादा), विकास लाहीगडे, संजय लाहिगडे, फिरोज अत्तारं, सोमनाथ लाहिगडे, मकरंद माने, अनिकेत लाहीगडे, सागर कांबळे, सुशांत माने, अभिषेक दंडवते, सुरज देशमुख, अक्षय लाहिगडे, गणराज देशमुख उपस्थित होते.







Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .