येवती येथे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन.

 येवती येथे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन.

       

 उंडाळे - प्रतिनिधी.

  येवती ता. कराड येथे चंद्रभागा रूलर डेव्हलपर ,जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ, बौद्धजन हितवर्धक संघ येवती/ मुंबई यांच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धेचे   आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दीपक लोखंडे यांनी दिली ,छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे व त्यांनी बांधलेल्या गड किल्ल्याचे संवर्धन व्हावे याच दृष्टिकोनातून या भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .या किल्ल्या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 7000 व ट्रॉफी द्वितीय बक्षीस 5000 व ट्रॉफी तृतीय बक्षीस तीन हजार व ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. तसेच हा किल्ला शिवकालीन किंवा बुद्धकालीन असावा याची उंची दोन फुट व  लांबी तीन फूट असावी अशी नियमावली ठरण्यात आली आहे.या  स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन  करण्यात आले आहे .



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .