ऐश्वर्या माने हिची फायर ब्रिगेड मॅन पदावर निवड.

 ऐश्वर्या माने हिची फायर ब्रिगेड मॅन पदावर निवड.


उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या लक्ष्मण माने हिची मुंबई महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड मॅन या पदावर नुकतीच निवड झाली. तिच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी ऐश्वर्या माने हिने आपल्या निवडीच्या वेळचे स्वतःचे अनुभव सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ऐश्वर्या माने हिच्या या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी सर्व संचालक मंडळ व प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .