कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल या विषयावर वेबिनार संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल या विषयावर वेबिनार संपन्न.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल या विषयावरती विजय दाबडे. ( सीनियर जनरल मॅनेजर मॅनकाईड फार्मा कंपनी) यांचे वेबिनार संपन्न झाले.
औषध निर्माण शास्त्र म्हणजेच फार्मसी महाविद्यालयामध्ये औषधे कशी तयार करायची व त्याचे फायदे, तोटे तसेच त्याचा शरीरावर चांगला व वाईट परिणाम कसा होतो हे शिकवले जातेच पण प्रात्यक्षिकरित्या औषधाची गुणवत्ता कशी सांभाळली जाते. त्यासाठी विविध गोष्टींची प्रक्रिया कशी केली जाते. कोणते विभाग त्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. फार्मासिस्ट म्हणून काही विशिष्ट जबाबदाऱ्या घेणे बंधनकारक असते. तसेच सर्वांची सुरक्षा औषधांची व औषधांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची शुद्धता ही तितकीच महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांना फक्त सैद्धांतिक ज्ञान असते प्रत्यक्ष औषध निर्माण कंपनीमध्ये गुणवत्ता सांभाळण्यासाठी विविध प्रकारे सामोरे जावे लागते हे विजय दाबडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले.

Comments
Post a Comment