कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वृषक मेहता यांचे वेबिनार संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वृषक मेहता यांचे वेबिनार संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये बेसिक ऑपरेशन ऑफ फार्मास्युटिकल्स कंपनीज फोकसिंग ऑन प्रॉडक्ट प्रमोशन अँड डिस्ट्रीब्यूशन नेटवर्किंग या विषयावरती वृषक मेहता (जनरल मॅनेजर मार्केटिंग इनटास फार्मास्युटिकल लिमिटेड )यांचे वेबिनार संपन्न झाले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त औषध कंपनीमध्ये कशाप्रकारे प्रोडक्शन, पॅकेजिंग, मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरिंग तसेच मार्केटिंग कशा प्रकारे केले जाते त्यासाठी विविध प्रोसेस कशा कराव्या लागतात. मार्केटिंग औषधांचा सेल कसा केला जातो व त्यासाठी कसे नेटवर्किंग वाढवले जाते. तसेच प्रॉडक्ट क्वालिटी कशाप्रकारे मेंटेन ठेवली जाते हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. दीप्ती पाटील यांनी मानले

Comments
Post a Comment