माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून दिला पर्यावरणाचा संदेश.

 माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून दिला पर्यावरणाचा संदेश.

वडगांव हवेली  - वार्ताहर

आजकाल सर्वत्र  अनेक शाळांमधून माजी विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलने होत असताना दिसतात. एकत्रित येऊन स्नेहसंमेलनाचा आनंद लुटण्याबरोबर   यामधून समाजपयोगी उपक्रम राबवणेत चा माणस काहीजणच ठेवतात येथील महात्मा गांधी विद्यालयाचे   मार्च 2007 बॅच च्या विद्यार्थ्यांचा  स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी शाळेचे माजी शिक्षक व्यवहारे सर, पतंगे सर, सावंत सर, सूर्यवंशी सर, परीट सर उपस्थित  होते.

कार्यक्रमाची  सुरुवात दीप प्रज्वलाने झाली.  त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत व प्रार्थना झाली.

यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शाळा परिसरात शुशोभीकरणासाठी  या या बॅचच्या मार्फत माजी शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करून  एक नवा संदेश देणेत आला.

तसेच आपण ज्या शाळेत ज्ञानाचे धडे गिरवले  या शाळेतील भावी विद्यार्थ्यांसाठी शाळेला फळे ( ब्लॅक बोर्ड ) देण्यात आले यावेळी सर्व  शिक्षकांचा   सन्मानचिन्ह आणि एक रोपटे देऊन  सन्मान करण्यात आला..

तसेच येथून पुढे शाळेत विविध परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी बक्षीस देण्याचा व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा नवीन उपक्रम या बॅच तर्फे राबवण्याचा निर्णय झाला.

    यावेळी सर्व शिक्षकांची व विध्यार्थ्यांनीची  मनोगत व्यक्त केली यामधून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..

यावेळी सर्व विद्यार्थ्याला  भेटवस्तू देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .