गावगाडयातील पत्रकारांना संघटीत करुन पत्रकारांच्या न्याय हक्काची लढाई चालु करणार.
गावगाडयातील पत्रकारांना संघटीत करुन पत्रकारांच्या न्याय हक्काची लढाई चालु करणार.
_______समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर.
कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)
हादरा बातमीपत्राचे संपादक व डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालीस्ट स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर म्हणाले देशाचा चौथा खांब समजला जानार्या पत्रकारांची फरपट होवू नये व गावगाडयातील पत्रकारकारांना कोणी त्रास देवू नये या साठी गावगाडयातील पत्रकारांना संघटीत करुन डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालीस्ट स्टुंडट असोसिएश्नच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय हक्काची लढाई चालू करुन पत्रकारांची चळवळ मजबूत करणार यासाठी सर्व पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्यांना सोबत घेवून पत्रकारांच्या हक्काची लढाई सुरु ठेवून पत्रकारांचे अस्तिव निर्माण करणार. यासाठी लवकरच बैठकिचे आयोजन करण्यात येणार असून सर्व पत्रकारांनी एक संघ होवून आपल्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे.ज्या वेळी कोणावरही संकट व अडचण येते तेथे पत्रकारांची आर्वजून आठवण येते ,पण पत्रकार अडचणीत असला तर त्याच्याकडे पाठ फिरवली जाते हे विधारक चित्र मोडीत काढण्यासाठी पत्रकारानी एक संघ होवून आपली ताकत वाढवली पाहीजे असे समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर म्हणाले.

Comments
Post a Comment