श्री. कोटेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.
श्री. कोटेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.
तब्बल 20 वर्षांनी भरली माजी विद्यार्थी शाळा- जुन्या आठवणींना उजाळा.
गोवे.ता.सातारा येथील श्री कोटेश्वर विद्यालय,गोवे.या विद्यालयात तब्बल 20 वर्षांनी 2003-04 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती.सर्वांनी मिळून आपल्या शाळेत रमण्याचा वर्गातील बाकावर बसण्याचा आनंद घेतला.सर्व जुने मित्र तसेच एकाच डब्यात जेवणारे सवंगडी त्याच शाळेत भेटल्याने माजी विद्यार्थी आनंदाने भारावून गेले.दैनंदिन जिवनातील आपले कामकाज,आपले विचार सोडून एक दिवस आपल्या शाळेसाठी देत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाली या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती विभा साबळे उपस्थित होत्या.मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली .माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अनोखी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.गीतगायन,संगितखुर्ची तसेच डान्स इत्यादी कार्यक्रमाने मेळावा रंगला. प्रत्यक्ष आपल्या शिक्षकांना जुन्या वर्गात बोलावून विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे घेतले.माजी विद्यार्थ्यांनी सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते.या बॅचमधील माजी विद्यार्थी हे शिक्षक,व्यवसायिक तसेच उच्च पदस्थ अधिकारी ,कंपन्यांचे मालक,सैनिक ,बँक अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ठ काम करत आहेत.
आपल्या शाळेसाठी व मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत भर घालण्यासाठी या विद्यालयासाठी मदतीचा हात म्हणून स्मार्ट टी.व्ही भेट दिली.या कार्यक्रमासाठी आजी व माजी शिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष श्री नंदाभाऊ जाधव यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी गणेश जाधव,विशाल जाधव,सागर जाधव ,किरण जायकर,सागर यादव,अभिजित शिंदे,महेश शिंगटे,रेश्मा जाधव,रोहिणी शिंगटे,संतोष जाधव , अमित जाधव,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधुरी भोसले व स्नेहल साळुंखे यांनी केले.

Comments
Post a Comment