Posts

Showing posts from August, 2025

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत

Image
  मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण   सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : गुन्ह्यांचा छडा लावून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साधनसामग्री देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस दलास अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व त्यासोबत प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. यामुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने व अधिक सक्षमतेने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पोलीस दलाला मोठी ताकद प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. पोलीस दलास प्राप्त मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,...

दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबवा यासाठी निवेदन.

Image
  दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबवा यासाठी निवेदन. शिराळा - प्रतिनिधी. दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबावा यासाठी निवेदन देण्यात आले.भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका उपाध्यक्ष  सुनिल घोलप  यांच्या नेतृत्वाखाली   केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री  आयु.रामदासजी आठवले यांना  निवेदन  पश्चिम महाराष्ट्र सचिव  आयु.जगन्नाथ ठोकळे नगरसेवक  सांगली मिरज कुपवाड महापालिका यांच्या हस्ते  देण्यात आले. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत असणाऱ्या कामांना  पालकमंत्री खासदार, आमदार  यांची शिफारस पत्रांची आवश्यकता कशासाठी तसेच  संरक्षण भिंत व सामाजिक सभागृह ही मोठी कामे रद्द केली आहेत,त्या कामांचा समावेश करावा.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले गटाची बैठक  हुतात्मा नानकसिंग विद्यालय सोनवडे येथे संपन्न झाली. यावेळी हे निवेदन देण्यात आले.यावेळी  आयु.ठोकळे  म्हणाले  आर. पी. आय. आठवले गट शिराळा तालुक्यात सक्षम पणे उभा करून तारूणांना उद्योजक बनवू  राज्यातील व...

आपत्तीतील हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा

Image
  आपत्तीतील हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी अशोक काकडे - शिराळा तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थितीचा घेतला आढावा सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : संभाव्य आपत्तीत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या. शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याबरोबर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मान्सून कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल, पोलीस, पाटबंधारे, आरोग्य, बांधकाम, विद्युत विभाग, जिल्हा परिषद व प्रसारमाध्यमे यांचा योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे.जिल्हा व तालुका स्तरावर करावयाच्या तात्काळ उपाययोजना संबंधित विभागांनी कराव्यात. नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत. प्रशिक्षि...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन कराड - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे व्यक्तिमत्व विकास  या  विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड येथील प्रा. डॉ. साधना शाही या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यास करत असताना एखादा विषय जर अवघड जात असेल तर  त्या विषयाचे मुद्दे एका पानावरती सगळे लिहून घ्यावेत व ते लक्षात राहण्यासाठी तेच तेच परत वाचावेत, तसेच अभ्यास करताना वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे  असून  सकाळी लवकर उठून पहिल्यांदा अवघड विषयाचा अभ्यास करावा व नंतर राहिलेल्या विषयांचा, तसेच एखादी गोष्ट आपण एका व्यक्तीजवळ बोललो तर तीच गोष्ट तो दुसऱ्या व्यक्तीला कशी सांगतो व दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीजवळ कशी सांगते  म्हणजेच आपण पहिल्या व्यक्तीला बोललेली गोष्ट ही तिसऱ्या व्यक्तीजवळ जाईपर्यंत कशी बदलते हे त्यांनी प्रात्यक्षिक करून त्यांनी दाखवले. तसेच आपल्...

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी

Image
  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी._____डॉ. अशोक यादव. कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 19 महाराष्ट्र बटालियन कराड एनसीसी विभाग यांचे वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -आयुष्यमान भारत याविषयीचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अशोक यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे- आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी होय. भारत सरकारने निर्माण केलेल्या या योजनेत कोट्यावधी लोक सहभागी आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेताना या योजनेने रुपये पाच लाखापर्यंत चे अनुदान नागरिकांच्या साठी दिलेले आहे. आज आरोग्याचा प्रश्नांचा विचार केला तर गोरगरीब माणसांना आर्थिक परिस्थिती अभावी दवाखान्याचा खर्च परवडत नाही. पैशाअभावी अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. परंतु या योजनेत सहभागी झाल्यामुळे रुपये पाच लाखापर्यंत चा मोठा खर्च शासन करते. त्यामुळे पात्र असलेल्या नागरि...

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान.

Image
  ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान.                               _______प्रो.( डॉ.) सतीश घाटगे.   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय विभागाच्या वतीने उत्साहात साजरी झाली.ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते, यावेळी बोलताना कार्यक्रमाचे पाहुणे म्हणाले की ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान! रंगनाथन हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते. एक गणिताचे अभ्यासक असून देखील ग्रंथालय चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रंथालय अभ्यासासाठी ते लंडनला गेले व परत आल्यानंतर ग्रंथालय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्त...

महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो

Image
  महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो ____प्राचार्य प्रो. ( डॉ.) सतीश घाटगे   कराड - प्रतिनिधी. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे बी.ए.भाग एक व बी.कॉम. भाग एक विद्यार्थ्यांच्या साठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवागतांचे स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो. महाविद्यालयीन शिक्षण ही घरात बसून शिकण्याची प्रक्रिया नाही. वर्गात प्रत्यक्ष बसून घेतलेले शिक्षण हे विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयात विविध उपक्रम साजरे केले जातात. विविध विषयांचे ज्ञान मिळते. ज्ञानातून माणूस क्रियाशील बनतो व सुसंस्कारित विचाराने तो भावात्मक दृष्ट्या उत्तम तयार होत असतो. गुरुजनांचे दररोजच्या व्याख्यानातून अध्यापनातून विद्यार्थ्यांच्यावर सुसंस्कार होतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी...

हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य.

Image
  हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य. __________मास्टर सय्यद हुसेन   कराड - प्रतिनिधी. 15 ऑगस्ट 2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मास्टर सय्यद हुसेन होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. आज आपण सर्व नागरिक देशभर उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारक अनेक समाजसुधारक व सर्वसामान्य जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला व स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी तुरुंगवास सोसला. अनेक स्वातंत्र्यवीर शहीद झाले. भगतसिंग,सुखदेव, राजगुरू, बाबू गेणू इत्यादी हजारो तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर महात्मा गांधी लोकमान्य टिळ...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

Image
  भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाही उद्घाटन समारंभ •  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून अत्यल्प वेळेत हेरिटेज वास्तूला झळाळी कोल्हापूर, दि.17 (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला.  प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर...

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये आपली संविधान पंच्याहत्तरी कार्यक्रम

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये आपली संविधान पंच्याहत्तरी कार्यक्रम  शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये अनुलोम लोकराज्य अभियान यांच्या वतीने आपली संविधान पंच्याहत्तरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री बी. एम. नलवडे  यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते  हे होते. या कार्यक्रमास अनुलोम लोकराज्य अभियान सांगली जिल्हा व कोल्हापूर विभाग प्रमुख प्रशांत कुंभार , जनसेवक अनिल माने , कार्यक्रमाचे वक्ते विधी तज्ज्ञ मा. ॲड.विशाल साळुंखे  आदि मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक मा.अरविंद सदावर्ते  यांनी बुके देऊन स्वागत  सत्कार केला. कार्यक्रमाचे वक्ते मा. ॲड. विशाल साळुंखे यांनी भारतीय संविधान निर्मिती व अमंलबजावणी इतिहास सांगितला. भारतीय राज्यघटना विविध समित्या व त्यांचे कार्य, भारतीय राज्यघटना कलमे, विभाग, परिशिष्ट, व त्यात आजपर्यंत झालेले बदल याविषयी विस्तारपूर्वक माहिती दिली. भारतीय संविधानातील विभा...

एकता मंडळाच्या वतीने मलकापूर येथे वृक्षारोपण.

Image
  एकता मंडळाच्या वतीने मलकापूर येथे वृक्षारोपण.  एकता मंडळाचा स्तुत्य उपक्रम. कराड - प्रतिनिधी. कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील सलग पाच वर्षे गणराया अवाॅर्ड विजेत्या एकता मंडळाच्यावतीने ७९ व्या स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.   एकता मंडळाची स्थापना १९८३ रोजीची असुन मंडळाने गेल्या ४३ वर्षांमध्ये आरोग्यशिबीर, रक्तदान शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी चिञकला,वतृत्वस्पर्धा, निबंध स्पर्धा,जेष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांसाठी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक क्षेञामध्ये नेहमी अग्रेसर असणार्‍या एकता मंडळाच्यावतीने आपल्या भारत देशाच्या ७९ व्या स्वातंञ्य दिनानिमित्त शास्ञीनगर येथे विविध औषधी वृक्षांसह इतर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी बोलताना मंडळाचे  अध्यक्ष तानाजी देशमुख म्हणाले की वृक्षारोपण हि काळाची गरज आहे हवामानातील बदल येणार्‍या नैसर्गिक संकटांची चाहूल पर्यावरण आपणाला देत आहे. त्यामुळे समाजातील स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण ही चळवळ सुरु केली पाहिजे  आपल्या परिसरामध्ये प्रत्येक सजग न...

शिव केदार विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

Image
  शिव केदार विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. वारणा विकास शिक्षण मंडळ कांदे चे शिव केदार विद्यालय, कांदे ता. शिराळा जि. सांगली येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.संस्थेचे जेष्ठ संचालक मा. विलास हुजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी  संस्थेचे सर्व  संचालक मा. निवासराव पाटील, मा. दीपक पाटील, मा.अरविंद पाटील, मा. विकास पाटील, महिला बाल सुरक्षा अधिकारी ,महाराष्ट्र शासन मा. संजय पाटील, मुख्याध्यापक मा. सौ. स्मिता पाटील,मा. सौ. सीतांजली जाधव,मा. रोहित पाटील, मा. सौ. तेजश्री पाटील,श्री. लहू कांबळे, श्री. आनंदा बंडगर, श्री. शैलेश चव्हाण, श्री. अमोल सपाटे. इयत्ता ९वी, १०वीच्या विद्यार्थ्यांनी झांजपथकाच्या साह्याने राष्ट्रध्वजास सलामी दिली. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ  बहुसंख्येन उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Image
  जिल्हा परिषद शाळा पाचगणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. शिराळा - प्रतिनिधी. पाचगणी ता.शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाचगणी येथे १५ ऑगस्ट 2025 रोजी  भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  गावच्या प्रथम नागरिक मुंबई पोलिस  सौ.सिध्दी सुजित चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कविता, भाषणे, नाटिका आणि गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत सर्वांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन शपथ घेतली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, एकता आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

तीन महिन्यात सहा बालविवाह रोखण्यात यश.

Image
  तीन महिन्यात सहा बालविवाह रोखण्यात यश. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांचा पुढाकार आवश्यक. _______जिल्हाधिकारी संतोष पाटील. महिला व बालविकास विभागाकडील विविध विषयांची  आढावा बैठक संपन्न.   सातारा - जि. मा. का. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सहा बालविवाह रोखण्यात आले आहेत. यामध्ये सातारा , कराड तालुक्यातील घटनांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन ठोस कार्यवाही करावी. आपली जबाबदारी पार पाडण्यात जे ग्रामसेवक ग्रामसेवक कमी पडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माहिला व बालविकास विभागाकडील जिल्हा सनियंत्रण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पुनर्वसन समिती, जिल्हास्तरीय कृती दल समितीची बैठक पार पडली . बैठकीसाठी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मीना बेदरकर, जिल्हा महिला  बालविकास अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्ह...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन  उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य व व्यावसायिक शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारे विकसित व्हावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या  स्पर्धेमध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्यांनी पाण्याचे शुद्धीकरण, रक्तदाबाचे मॉडेल, चेतापेशी, इंडस्ट्रीचा लेआउट, कार्बनचे शुद्धीकरण, उती वनस्पती अशा विविध विषयावर मॉडेल सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी परिक्षक  म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पूजा भोसले यांनी केले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे इनोवेटीव थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीस अँड फार्मासुटिकल ॲप्लीकेशन या विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, घोगाव येथील मॅकॅनिकल अँड मॅकॅट्रोनिक्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे एच.ओ.डी. प्रा. भरतराज भोसले व प्रा. आशिष कणसे हे उपस्थित होते. यावेळी भरतराज भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना थ्रीडी म्हणजे आकार घडविणे आणि आपली कल्पना प्रत्यक्षात उतरवणे, थ्रीडी प्रिंटिंगची प्रक्रिया ही पातळ आवरण असुन हे द्रव पदार्थ पावडर, प्लास्टिकचा वापर करून होते. तसेच थ्रीडीचा फायदा म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात मटेरियल खराब होत नाही व त्याची प्रक्रिया आकार, कापणे, छापणे व प्रक्रिया या चार प्रक्रियेत होते. फार्मसी क्षेत्रात आपण औषधे तयार करताना कसा वापर करू शकतो, हेल्थकेअर मेडिसिन्स, घरे बांधण्यासाठी, अवयव तयार करणे, त्वचेचे टिशू तया...

ॲड. डॉ. सुरेश माने यांचा वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप.

Image
ॲड. डॉ. सुरेश माने यांचा वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप. मुंबई - प्रतिनिधी. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) चे संस्थापक अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व संघर्षशील नेतृत्व, ऍड. डॉ. सुरेश माने सर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने माँ हॉस्पिटल, चेंबूर येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबई युनिट BRSP तर्फे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात मुंबई अध्यक्ष श्री. दिपक चौगुले यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी BRSP च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला यावेळी पंकज चाळके (युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष ), बाळासाहेब अडांगळे (जेष्ठ BRSP नेते), तुकाराम धांडोरे (जेष्ठ BRSP नेते), खालीलभाई शिरगांवकर (BRSP मुंबई उपाध्यक्ष), वत्सला हिरे मॅडम (दक्षिण मुंबई महिला आघाडी प्रमुख), धंनजय तुपलोंढे (जिल्हा महासचिव), सतेश मस्के (चेंबूर अध्यक्ष), अक्षय साळवे (प्रदेश पदाधिकारी कामगार आघाडील), अमर जाधव (वरळी विधानसभा प्रभारी), शशिकांत स...

विद्यार्थ्यांने सापडलेला मोबाईल केला परत.

Image
विद्यार्थ्यांने सापडलेला मोबाईल केला परत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्याला शाबासकी ,कौतुक व  अनोखी भेट. कराड - प्रतिनिधी. शाळेच्या प्रांगणात दुपारच्या वेळेस सापडलेला महागडा मोबाईल फोन कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याची घटना घडली आहे.  टिळक हायस्कूल कराडमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या सोहम संतोष वायदंडे रा. सोमवार पेठ कराड यांला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांनी शाबासकी देत कौतुक केले आहे . यावेळी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर,सज्जन जगताप, संग्राम पाटील श्रीमती भोसले यांची उपस्थिती होती. दिनांक 5-8 2025 रोजी दुपारच्या वेळेस टिळक हायस्कूलच्या प्रांगणात realme 5 g  कंपनीचा मोबाईल फोन सोहम वायदंडे याला सापडला होता. त्याने हा मोबाईल आपल्या  पालकांना शाळेत सापडला आहे असल्याचे सांगितले त्यानंतर सोहम वायदंडे व पालकांनी हा मोबाईल कराड शहर पोलीस ठाण्यात जाऊन जमा केला त्यानंतर पोलीस प्रशासनाने हा मोबाईल कोणाचा आहे.याचा शोध घेत सदरचा हा मोबाईल खात्री करून मूळ मालकास सौ वैशाली वाढेकर  रा.मंगळवार पेठ कराड यांना...

अशोक चक्राचा अपमान – मध्य रेल्वेला BRSP कडून निषेध पत्र

Image
अशोक चक्राचा अपमान बी.आर. एस.पी. कडून  मध्य रेल्वेला  निषेध पत्र मुंबई - प्रतिनिधी.  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी बी.आर.एस.पी. मुंबई प्रदेशाध्यक्ष दीपक एम. चौगुले यांनी आज मध्य रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन देऊन, स्वच्छता अभियानाच्या नावाखाली झालेल्या अशोक चक्राच्या अपमानाचा तीव्र निषेध नोंदविला.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीत भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रावर झाडू लावलेले दृश्य प्रसिद्ध झाले असल्याचे चौगुले यांनी निदर्शनास आणले. त्यांनी सांगितले की अशोक चक्र हे भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाचे गौरवचिन्ह असून, अशा प्रकारे केलेला अवमान हा असंविधानिक, दुर्दैवी व देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारा आहे. निवेदनात बी.आर.एस.पी. ने खालील मागण्या केल्या आहेत. संबंधित प्रकाराची तात्काळ चौकशी करणे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे. अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करणे. वादग्रस्त जाहिराती तात्काळ रद्द करून सर्वत्रून हटविणे. रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक माफी मागणे. चौगुले यांनी ...

कोल्हापूर सर्किट बेंच इमारतची कामे वेळेत आणि गतीने पुर्ण होतील

Image
  कोल्हापूर सर्किट बेंच इमारतची कामे वेळेत आणि गतीने पुर्ण होतील – पालकमंत्री प्रकाश आबिटकर पुढिल तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी कोल्हापूर, दि. 08: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत असून, इमारतीची सुरू असलेली कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील प्रस्तावित सर्किट बेंच इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शाखा अभियंता रोहण येडगे, कंत्राटदार अनिकेत जाधव व उदय घोरपडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. इंद्रजित चव्हाण, टी. एस. पाडेकर, व्ही. आर. पाटील, के. व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील उपस्थित होते. पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी तिन्ही इमारतींच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या तीन कोर्ट रूम्सची पाहणी केली. यावेळी त्या...

अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची उच्चस्तरीय बैठक

Image
  अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची उच्चस्तरीय बैठक मुंबई, ७ ऑगस्ट — अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांना बोलावून उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सजीव ओ. पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, राज्यकर, वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, मित्राचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल  तसेच, मित्राचे अर्थ तज्ज्ञ संजीव सक्सेना, मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे आणि अर्थतज्ञ ऋषी शाह यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत जीडीपी, रोजगार, वाणिज्य आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर संभाव्य परिणाम, तसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री श्री.फड...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणार पर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ

Image
  पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणार पर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ    - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सातारा दि.7 : पर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. याचा अनुभव घेऊन महाबळेश्वर, पाचगणीच्याच धर्तीवर लवकरच मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. महाबळेश्वर व पाचगणी येथे माहे मे मध्ये सुरु करण्यात आलेल्या पर्यटक सुरक्षा दलाच्या कामगिरीचा आढावा पर्यटन तथा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक श्री. भालचीम आदी उपस्थ...

कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल - जिल्हाधिकारी अशोक काकडे

Image
  कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल  - जिल्हाधिकारी अशोक काकडे - मूकबधीर विद्यार्थ्यांसाठीच्या 15 दिवसीय प्रशिक्षणाची सांगता - राज्यातील पहिला उपक्रम   सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून मूकबधीर विद्यार्थी स्वावलंबी होतील. त्यांना रोजगार – स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल करणारा हा उपक्रम आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्यात सांगली जिल्ह्यातील उर्वरित 12 मूकबधीर शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवला जाईल. याचबरोबर एमकेसीएलच्या मदतीने दिव्यांगांना एमएससीआयटी अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले.  सांगली जिल्ह्यातील व राज्यातील पहिल्या अशा मूकबधीर विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षण उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. रा. हि. भिडे मूकबधीर शाळा, मिरज येथे आयोजित या क...

कालवडे ग्रामपंचायतीचा आडमुठेपणा उघड

Image
  कालवडे ग्रामपंचायतीचा आडमुठेपणा उघड बेघर वस्तीतील सांडपाणी तुंबले; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, तीव्र नाराजी  कराड - प्रतिनिधी. कालवडे (ता. कराड) येथील बेघर वस्ती भागात रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी त्यात सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्याने संपूर्ण वस्तीत दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थ गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत. ग्रामपंचायतीकडे सातत्याने निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. ग्रामपंचायतीमार्फत या वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र सांडपाणी वाहून नेण्यासाठी योग्य उतार वा निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी सांडपाणी तुंबून रहात असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात गटारातील पाणी थेट लगतच्या घरांमध्ये शिरत असून, त्यामध्ये अळ्या, किडे निर्माण झाले आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत चालला आहे. या समस्येने किसन गुजर, रमेश काकडे, राजेंद्र घोडके, महादेव मोटे, सतीश पवार, संदीप थिटे, वसीम देसाई आदि कुटुंबीय त्रस्त झाले असून, त्यांनी याबाबत गेल्या अ...

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त

Image
  मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ    सांगली, दि. 6, (जि. मा. का.) :  महसूल सप्माहनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणंद, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त , रूंद करण्याच्या मोहिमेत मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याची माहिती तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी दिली.  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नव महसूल वर्षाचे निम्मित दि. 1 ते 7 ऑगस्ट कालवधीत नागरिकांना महसुली सेवा देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदशानाखाली मिरज तालुक्यामध्ये सर्व मंडळ स्तरावर "पाणंद/शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करणे/रुंद करणे व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याबाबत अभियान राबविण्यात आले.  हा कार्यक्रम मंडळ स्तरावरील गावांमध्ये आयोजित करण्यात आला. यामध्ये लिंगनूर, आरग, बेडग, मालगाव, सोनी, कानडवाडी, सलगरे येथील जवळपास 7.5 किमी लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमण मुक्त/खुले करण्यात आले. तसेच हे रस्ते भविष्य काळात सुरक्षित राहतील व प्रवाशांना सावली मि...

ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Image
  राज्यातील 5 ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; नियमितपणे आढावा, समन्वय साधणार मुंबई, दि. ६ : - राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग व त्यांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त अधिकारी पुढीलप्रमाणे – श्री क्षेत्र भीमाशंकर (जि.पुणे) – सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा., श्री. क्षेत्र घृष्णेश्र्वर (जि. छत्रपती संभाजीनगर) ...