Posts

Showing posts from November, 2025

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ग्रंथालय क्लब आयोजित शैक्षणिक लेखनासाठी ज्ञानसाधनांच्या शोधावरील राज्यस्तरीय कार्यशाळा.

Image
  राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ग्रंथालय क्लब आयोजित शैक्षणिक लेखनासाठी ज्ञानसाधनांच्या शोधावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न. कासेगाव – प्रतिनिधी.  राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने “शैक्षणिक लेखन करताना आवश्यक असलेल्या विविध माहितीस्त्रोतांचा अभ्यास व शोध घेणे” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला राज्यभरातून सुमारे 70 सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे आयोजन दोन स्वतंत्र सत्रांत करण्यात आले होते.पहिल्या सत्रात प्रख्यात माहितीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुधीर नगरकर यांनी “New Trends in Library and Information Literacy” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल युगातील प्रगत लायब्ररी सेवा, ई-रिसोर्सेसचा प्रभावी वापर, माहिती शोध तंत्रे, तसेच विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी माहिती साक्षरता विकसित करण्याची गरज यांवर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. दुसऱ्या सत्रात संशोधन लेखनातील निपुण मार्गदर्शक डॉ. कांतीलाल ताम्हणे यांनी “How to Write a Research Paper” या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. संशोधन समस्या निवड, साहित्य समीक...

संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात संविधान सन्मान बाईक रॅली उत्साहात संपन्न.

Image
  संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात "संविधान सन्मान बाईक" रॅली उत्साहात संपन्न.   शिराळा - प्रतिनिधी. (नानासाहेब कांबळे.) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा शिराळा तालुक्याच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.संविधानाचा जागर व संविधानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शिराळा तालुक्यातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. संविधान वादी आणि संविधान प्रेमी सर्व उपासक आणि उपासिका विविध गावातून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. बिऊर येथून सुरुवात होत असताना विहारामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रा. जोखे सर यांनी संविधानाच्या  प्रास्ताविकाचे वाचन केल्यानंतर रॅलीतील उपासक आणि उपासिकांना तेथील धम्म बांधवांनी सर्वांना मिठाई वाटप केले. उपवळे, तडवळे अंत्री, शिरशी मार्गे पाचुंब्री मध्ये रॅलीचे आगमन होताच प्रत्येक गावच्या उपासक आणि उपासिकांनी गावात स्वागत केले . तेथील गावच्या बार्टीच्या अधिकाऱ्यांनी संविधानाबद्दल खूप चांगली माहिती दिली. करमाळे, खेड, रेड, कापरी मार्गे रॅली इंग्रुळ मध्ये आल्यानंतर सर्व बा...

भूशास्त्र संकुलात PM–USHA अंतर्गत ‘अर्थ सायन्सेस ब्रिज कोर्स’चा शुभारंभ.

Image
  भूशास्त्र संकुलात PM–USHA अंतर्गत ‘अर्थ सायन्सेस ब्रिज कोर्स’चा शुभारंभ. सोलापूर- प्रतिनिधी.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलात PM–USHA (MERU) अंतर्गत आयोजित “Fundamentals of Earth Sciences Concepts and Practices: A Bridge to Sustainability” या चार दिवसीय ब्रिज कोर्सचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. मंगेश वेदपाठक यांनी केले. कोर्सचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी आणि कौशल्यविकासासाठी अशा ब्रिज कोर्सचे महत्त्व अधोरेखित केले.शाश्वत विकासाच्या दिशेने भूशास्त्र संकुलाने घेतलेली वाटचाल आणि विद्यापीठाच्या प्रगतीतून होणारे योगदान याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत काळे यांनी भू-माहिती प्रणाली (GIS) चा पर्यावरण, शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील उपयोग यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या ...

संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून संविधान दिंडी मार्गस्थ.

Image
  संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून संविधान दिंडी मार्गस्थ. सातारा दि.  26: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकामध्ये जागरुकता व्हावी यासाठी “घर घर संविधान” हा उपक्रमाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागामार्फत आज दि. 26 नोव्हेंबर  रोजी सातारा शहरात संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी झेंडा दाखवून संविधान दिंडी मार्गस्थ केली.   कार्यक्रमास  जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, साताराचे उपायुक्त उमेश घुले,    समाज कल्याण, सहायक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी  विद्यानंद चल्लावार,  पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, साताराचे विशेष अधिकारी श्रुती रकटे, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी रोहित वाघ आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, यांनी संविधान मसूदा निर्मितीचे अध्यक्ष‍, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. ...

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न.

Image
  संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न.   सांगली, दि. 26 (जि. मा. का.): भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त "घर घर संविधान" हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काढलेली रॅली उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस.टी. स्टॅन्ड, परिसर, सांगली येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाप्रती सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस.टी. स्टँड परिसर सांगली मार्गापासून – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे- महानगरपालिका इमारत - सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली या मार्गावर संविधान रॅली काढण्यात आली. ही रॅली उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. रॅलीमध्ये समाज कल्याण विभागाकडील योजनांची माहिती देण्यासाठी समता रथ फिरविण्यात आला. रॅलीची सांगता स्टेशन चौक सांगली येथे झाली  यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहे...

विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षणा बरोबरच माणूस केंद्रित जीवन व्यवहार शिकणे गरजेचे.

Image
  विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षणा बरोबरच माणूस केंद्रित जीवन व्यवहार शिकणे  गरजेचे.  - डॉ. संदीप किर्दत. सातारा - प्रतिनिधी.      आज समाजामध्ये  स्वकेंद्रित व अर्थकेंद्रित व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या अधिक दिसते.  केवळ स्त्री-पुरुषाच्या पोटी जन्म झाला म्हणून व्यक्ती माणूस ठरतोच असे नाही तर ज्या स्त्री पुरुषांचा व्यवहार हा नैतिक मूल्यांना धरुन, निकोप समाज निर्माण साठी पूरक व मानव कल्याण केंद्रित असेल त्यालाच खऱ्या अर्थाने माणूस म्हणता येईल. आज तुलनेने समाजामध्ये माणूस व माणुसकीची वाणवा आढळते. त्यामुळे समाजात शोषक व शोषितांचे प्रश्न, धार्मिक सांप्रदायिक तेढ, वाढती गुन्हेगारी, नक्षलवाद, दहशतवाद, भौतिक साधनांचा अति मोह, वृद्धाश्रमांची वाढती संख्या, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा ,सावकारी , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला व अल्पसंख्यांकांची असुरक्षितता, भाकरी केंद्रित जीवन लक्ष्य ऐवजी धर्म केंद्रित ध्येय रुजविणारे भोवतालचे वातावरण व व्यसनाधीनता असे अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात. याकरिता सरकार, शिक्षक, कुटुंबातील सदस्य व सामाजिक संस्थांनी जाणून बुजून जैविक...

संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात भव्य बाईक रॅली.

Image
  संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात भव्य बाईक रॅली.   शिराळा- प्रतिनिधी. (नानासाहेब कांबळे.) संविधान दिनानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शिराळा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाचा सन्मान व संविधानाचा जागर करण्यासाठी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधान दिनाच्या बाईक रॅली ची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता बिऊर येथून सुरुवात होईल. या संविधान बाईक रॅलीचा मार्ग बिऊर, तडवळे, अंत्री, शिरशी, गिरजवडे, पाचुंब्री, बांबवडे, करमाळे, खेड, रेड, कापरी, इंग्रुळ, मांगले, कांदे,चिखली, नाटोली, सा गाव, कणदूर, पुनवत, फुपीरे, शिराळा खुर्द व रिळे या मार्गे जाणार आहे. या भव्य  संविधान बाईक रॅलीचा सांगता समारंभ रिळे येथे होणार आहे.  या भव्य संविधान बाईक रॅलीचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शिराळा तालुका व सर्व संविधान प्रेमी भारतीय नागरिक यांचे सहकार्य होत आहे.

राज्यात प्रथमच ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार प्राचार्य आणि संस्था अध्यक्षाला जेलची हवा,आणि आर्थिक दंड.

Image
राज्यात प्रथमच ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार प्राचार्य आणि संस्था अध्यक्षाला जेलची हवा,आणि आर्थिक दंड. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट. सविस्तर हकीकत अशी कि,मुंबई चेंबूर येथे श्री नारायण गुरु वाणिज्य महाविद्यालय आहे. तेथील प्राचार्य श्री. रवींद्रण कर्थाडी आणि संस्था अध्यक्ष श्री. एम. आय. दामोदरण, वरिष्ठ प्राध्यापिका सौं. जयश्री व्यकणटाचलम हे जाणीवपूर्वक मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, ओबीसी, आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांकडून दरवर्षी महाविद्यालत प्रथम वर्ष प्रवेशावेळी शासनाने (FRA)ठरवून दिलेल्या शुल्क्का व्यतिरिक्त, कैक पटीने जास्तीची फीस आकारून विद्यार्थी पालक यांचे शोषण करीत असे. तसेच मागासवर्गीय विदयार्थी यांच्या साठी (Sc, St, obc, miniority )केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या कडून आलेला निधी वर नमूद प्राचार्य, रवींद्रण कर्थाडी, एम. आय. दामोदरण आणि prof. जयश्री व्यँकटाचलम हे हडप करीत असे तसेच या तिघांनी पैसे कमविण्याची अजून एक शक्कल लढविली बारावी पास विद्यार्थी जे प्रथम वर्ष, बी. कॉम. साठी नियमांनुसार, मेरिट लिस्ट मधून पात्र असत त्यांना जबरदस्तीने add -on सर्टिफिकेट कोर्स च्या नावा खाली विद...

बाळसिद्ध विद्यालय घोगाव येथे हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन.

Image
  बाळसिद्ध विद्यालय घोगाव येथे हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन.                   घोगाव  - आरोग्याची तपासणी करून घेताना विद्यार्थी. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने बाळसिद्ध विद्यालय घोगाव येथे हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना हाताची स्वच्छता कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व त्यांची रक्त ग्रुप तपासणी व हेल्थ चेकअप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. जयश्री जगदाळे यांनी केले व  सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राचार्य हनमंत सूर्यवंशी यांनी केले. व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी मानले.

परीक्षा पास करून, नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक.

Image
  केंद्रीय सेवेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक.   जिल्ह्यात परीक्षा पास करण्यासाठी व नोकरी लावून फसवणूक करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय. गोंडवाना न्यूज वृत्तसेवा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या साताऱ्यातील चौघांना केंद्रीय सेवेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तब्बल 22 लाख 9 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल. याप्रकरणी तानाजी शंकर देवकर (रा. बनवपुरी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वैभव अण्णासाहेब बंडगर, विशाल अण्णासाहेब बंडगर आणि अन्नपूर्णा वैभव बंडगर (सर्व रा. टाकळी, ता. मिरज) यांचा समावेश आहे. फिर्यादी तानाजी देवकर हे व त्यांचे काही मित्र स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते. ते नॉन क्रिमिलेअर दाखला काढण्यासाठी साताऱ्यात गेले असताना त्यांची एकाशी ओळख झाली. त्याने मिरज तालुक्यातील टाकळीत एकजण केंद्रीय पत्रकार आहे. तो नोकरी लावून देतो, असे त्यांना सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये फसवणूक झालेले तरुण आणि वैभव बंडगर याची भेट झाली. प्रत्येकी 10 लाख रुपये दिल्यानंतर परीक्षा न देता दिल्ली पोलिस, रेल्वेम...

उंडाळे येथे 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर, वॉटर प्युरिफायर, सायकल या वस्तूंचे वितरण.

Image
उंडाळे येथे  50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कूटर, वॉटर प्युरिफायर, सायकल या वस्तूंचे वितरण. पंकज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद. ____मा. आनंदराव पाटील.  उंडाळे - प्रतिनिधी. उंडाळे ता.कराड येथे, भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील यांच्या वतीने  जनतेसाठी पहिल्यांदाच 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल या वस्तूंचे वितरण स्टॉलचे उदघाटन विधान परिषद मा.आमदार मा.श्री.आनंदरावजी पाटील (नाना) व य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मा.श्री.श्रीरंग देसाई (तात्या) यांच्या हस्ते करण्यात आले. पंकज पाटील यांचे कार्य कौतुकास्पद यावेळी मा.आनंदराव पाटील (नाना) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  "उंडाळे विभागामध्ये, आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांचे सामाजिक कार्य तळागाळात पोहचवण्याचे काम आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम, सर्व शासकीय योजना सर्वसामान्यान पर्यंत पोहचवून लाभ मिळवून देण्याचे काम आणि सवलतीच्या दरात 50% ऑफर देऊन शाळेतील विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ यांना विविध वस्तू उपलब्ध करून देण्याचे काम मा.पंकज पाटील यांनी केले आहे. ते इत...

सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप.

Image
  सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप. उंडाळे- प्रतिनिधी. भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने, भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील यांच्या वतीने तमाम जनतेसाठी पहिल्यांदाच 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, वाटर फिल्टर, रेंजर सायकल वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा. गुरुवार दि.20/11/2025 रोजी ठीक सायंकाळी 5 वाजता स्टॉलचे उदघाट्न करण्यात येणार आहे. आपण उपस्थित राहावे.ठिकाण - उंडाळे स्टॅंड, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, उंडाळे. असे आवाहन भाजप सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा. पंकज पाटील यांनी केले आहे.

कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार

Image
  कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार.  दि. 17 (जिमाका) : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. धारणी तालुक्यातील कोठा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आज कार्यक्रम पार पडला, यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष डॉ. निरुपमा देशपांडे, योगेश बापट आदी उपस्थित होते.        श्री. गडकरी म्हणाले, आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांचा विकास व्हावा, समाजात स्थान मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आदिवासींमध्ये कौशल्य असून त्यास प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. संप...

बी. आर.एस. पी. चे चेंबूर येथे आंदोलन

Image
  बी. आर.एस. पी. चे चेंबूर येथे आंदोलन. मुंबई- प्रतिनिधी. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ( BRSP ) संस्थापक अध्यक्ष ऍड डॉ सुरेश माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी चेंबूर विभागातील वॉर्ड क्रमांक 150 आणि 152 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या, शौचालय, वाढते प्रदूषण आणि मनपाच्या दुर्लक्षाबाबत एम वेस्ट मनपा कार्यालयावर घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले.आंदोलन होण्यापूर्वीच सहाय्यक आयुक्त यांनी एक दिवस पूर्वी संपर्क करून BRSP प्रतिनिधींना भेटीसाठी निमंत्रित केले. त्या भेटीदरम्यान पक्षाच्या प्रतिनिधींनी वॉर्ड मधील विविध समस्या सविस्तरपणे मांडल्या. सहाय्यक आयुक्तांनी आपल्या अधिकारी वर्गांच्या उपस्थिती मधे सर्व मुद्दे ऐकून घेत काही ज्वलंत प्रश्न तातडीने मार्गी लावू तसेच इतर समस्या एक आठवड्याचा अवधी मध्ये सोडविण्याचे समाधानकारक आश्वासन दिले.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर, सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्या विनंतीनुसार घेराव आंदोलन तात्पुरते स्थगित कर...

“जिसकी जितनी संख्या भारी – उतनी उसकी हिस्सेदारी!”

Image
“जिसकी जितनी संख्या भारी – उतनी उसकी हिस्सेदारी!” ‘आदिवासी जनचेतना महासम्मेलन’ भव्यदिव्य आयोजन.   गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त भव्य आयोजन गडचिरोली येथे दिनांक  १५ - १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, भारतीय आदिवासी परिषद आणि आदिवासी-दलित एकता परिषद  यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी जनचेतना महासम्मेलन’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा दोन दिवसीय ऐतिहासिक सोहळा १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी वीर बाबुराव शेडमाके सभागृह परिसर, गडचिरोली येथे पार पडणार आहे.या महासम्मेलनाचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत – ॲड. डॉ. सुरेश माने, संस्थापक अध्यक्ष, बी.आर.एस.पी. तसेच भारतीय आदिवासी परिषद व आदिवासी-दलित एकता परिषद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.महात्मा फुले, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक समता, स्वाभिमान, राजकीय हक्क आणि सांस्कृतिक ओळख या विषयांवर व्यापक जनजागृती घडवून आणणे हा या महामेळाव्याचा हेतू आह...

विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन.

Image
  विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन____ प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे. कराड  - प्रतिनिधी. 13 नोव्हेंबर 2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 59 व्या ए डी श्रॉफ स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्यातं आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन आहे. महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने वक्तृत्व कलेची जोड जोपासली तर नक्कीच त्यांचे व्यक्तिमत्व भविष्यात फुलणार आहे. अशा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या सभाधिटपणा येतो. स्वतःचे विचार इतरांसमोर चांगल्या पद्धतीने कसे मांडावे. याचा अनुभव या स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय येत नाही. अशा स्पर्धेतूनच महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री नामदार आर. आर. पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व घडले. नामदार लक्ष्मणराव ढोबळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्र...

इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणन करणे अनिवार्य.

Image
  इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणन करणे अनिवार्य. ___ जिल्हाधिकारी संतोष पाटील. सातारा, दि.12 : सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित करण्यात येणा-या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक विषयक सर्व जाहिरातीचे माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कडून पूर्व प्रमाणन करून घेणे अनिवार्य आहे. समाज माध्यमांचा समावेश, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या श्रेणीत करण्यात आल्याने त्यावर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचेही प्रमानण अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कळविले आहे.  पूर्व प्रमाणनाशिवाय अशा जाहीरातीचे प्रसारमाध्यामांना प्रसारण करता येणार नाही, निवडणूक विषयक जाहिरातीवर राजकीय पक्षाने खर्च केला असल्यास त्याचा समावेश पक्षाच्या तसेच उमेदवाराने खर्च केला असल्यास त्याचा समावेश निवडणूक उमदेवारच्या खर्चात होईल. एखाद्या व्यक्तीस किंवा मतदारास आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया वरून राजकीय मत व्यक्त करण्यास साधारणतः कोणतेही बंधन नाही. मात्र ४नोव्हेंबर २०२५ पासून जिल्ह्यामध्ये ९ नगरपरिषदा व १ नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता लाग...

कराड शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न.

Image
कराड शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा  उत्साहात संपन्न. कराड - प्रतिनिधी . कराड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा बाबुभाई पद्मसी हॉल, कराड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कराड शहरातील विविध विभागांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांमध्येच असते आणि आजच्या या मेळाव्यात तो आत्मविश्वास स्पष्ट दिसून आला. आगामी निवडणुकीत कराडचा सर्वांगीण विकास आणि सामान्य नागरिकांचे हित हेच केंद्रस्थानी राहील. आपल्या प्रत्येक बुथवर आपला झेंडा आणखी बळकट करण्यासाठी आपल्याला एकसंघपणे काम करायचं आहे.  या मेळाव्यात आगामी नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रचार धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील संपर्क मोहिम, जनसंपर्क कार्यक्रम, आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर विचारमंथन झाले. आगामी निवडणुका या सत्तेसाठी नव्हे, तर सुशासन, पारदर्शकता आणि विकासाच्या राजकार...

शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यासमोर सर्वश्रेष्ठ आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा

Image
  शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यासमोर सर्वश्रेष्ठ आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा ______प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे   कराड - प्रतिनिधी. 7 नोव्हेंबर2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड सांस्कृतिक विभाग, एनएसएस व एनसीसी विभाग यांचे वतीने  7 नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन (विद्यार्थी दिवस) वंदे मातरम 150 वा वर्धापन दिन (समूह गान) उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या समोर सर्वश्रेष्ठ आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाच्या माध्यमातून धुळीतून धुरंदरांच्या यादीत बाबासाहेबांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. देश विदेशात ज्ञानार्जन करून स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतले. शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा गुलामगिरीतील समाजाला संदेश दिला. समाजातील अनेक वाईट रूढी परंपरा कायद्याने बंद केल्या. अखंड भारताचे...

येळगाव महाविद्यालयात औषधांचा वापर कसा करावा याविषयी व्याख्यानाचे आयोजन

Image
  येळगाव महाविद्यालयात औषधांचा वापर कसा करावा याविषयी व्याख्यानाचे आयोजन उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयाने राज्य फार्मसी परिषद व ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या संयुक्त प्रयत्नाने घेण्यात आलेल्या औषध सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येळगाव येथील विद्यार्थ्यांना औषधोपचार आणि  धोके याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना औषधांचा वापर कसा करावा, चुकीची औषधे घेतल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, घरात पूर्वी उरलेली औषधे किंवा दुसऱ्यांची उरलेली औषधे घेऊ नये, डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्ट यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, औषधे कोणत्या ठिकाणी ठेवावी व चांगल्या नामांकित कंपनीचीच औषधे घ्यावीत व त्यावरील एक्सपायरी डेट पहावी व ते किती प्रमाणात घ्यायचे आहे ते पाहूनच ते औषध घ्यावे असे सांगितले. यावेळी  विद्यार्थ्यांना मेडिकलमधीलच औषधे घेण्यासाठी व औषधांचा योग्य वापर करण्यासाठी शपथ देण्यात आली. 

महिलांकरिता विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम

Image
  महिलांकरिता विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम घोगाव - महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली पाटील उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयाने राज्य फार्मसी परिषद व ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या संयुक्त प्रयत्नाने घेण्यात आलेल्या औषध सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी घोगाव परिसरातील महिलांसाठी औषधांचा वापर आणि धोके याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिलांना औषधांचा वापर कसा करावा, चुकीची औषधे घेतल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, घरात पूर्वी उरलेली औषधे किंवा दुसऱ्यांची उरलेली औषधे घेऊ नये, डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्ट यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, औषधे कोणत्या ठिकाणी ठेवावी व चांगल्या नामांकित कंपनीचीच औषधे घ्यावीत व त्यावरील एक्सपायरी डेट पहावी व ते किती प्रमाणात घ्यायचे आहे ते पाहूनच ते औषध घ्यावे असे सांगितले. यावेळी  महिलांना मेडिकलमधीलच औषधे घेण्यासाठी व औषधांचा योग्य वापर करण्यासाठी शपथ देण्यात आली. 

उंडाळे महाविद्यालयात औषध उपचार व धोके याविषयी व्याख्यानाचे आयोजन

Image
  उंडाळे महाविद्यालयात औषध उपचार व धोके याविषयी व्याख्यानाचे आयोजन           उंडाळे - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली पाटील उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयाने राज्य फार्मसी परिषद व ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या संयुक्त प्रयत्नाने घेण्यात आलेल्या औषध सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी  स्वा.  दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे येथील विद्यार्थ्यांना औषधोपचार आणि  धोके याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना औषधांचा वापर कसा करावा, चुकीची औषधे घेतल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, घरात पूर्वी उरलेली औषधे किंवा दुसऱ्यांची उरलेली औषधे घेऊ नये, डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्ट यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, औषधे कोणत्या ठिकाणी ठेवावी व चांगल्या नामांकित कंपनीचीच औषधे घ्यावीत व त्यावरील एक्सपायरी डेट पहावी व ते किती प्रमाणात घ्यायचे आहे ते पाहूनच ते औषध घ्यावे असे सांगितले. यावेळी ...

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

Image
  महाराजस्व समाधान शिबीर  संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.   उंडाळे - प्रतिनिधी. घोगाव येथील  संतकृपा शिक्षण संस्था, फार्मसी काॅलेजमध्ये भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार मा.श्री.डॉ.अतुलजी भोसले (बाबा) व तहसील कार्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री.शिवाजी महाराज "महाराजस्व समाधान शिबीर" उत्साहात पार पडले.या शिबिरात कराड दक्षिण मधील, उंडाळे विभागातील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला व डोमासाइल वितरण करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार श्री.बाजीराव पाटील, काॅलेज ऑफ डी फार्मसी च्या प्राचार्य सौ.वैशाली पाटील, घोगाव महसूल अधिकारी सौ.तृप्ती दाते, भाजपा कराड दक्षिण तालुका अध्यक्ष श्री.प्रविण साळुंखे, अँड. श्री.बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा सोशल मिडिया उपाध्यक्ष श्री.पंकज पाटील, माजी उपसरपंच सवादे श्री.संजय शेवाळे, माजी सरपंच टाळगाव श्री.आण्णासाहेब जाधव, माजी सरपंच म्हासोली श्री.आण्णासाहेब शेवाळे, चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव मा.अक्षय शेटे, उपसरपंच घोगाव श्री.निवास शेवाळे, माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव श्री.बाजीराव शेटे (सर), माजी चेअरमन विकास सेवा स...