चांदोली परीसरात जोरदार वादळी पाऊस. ' सोनवडे,आरळा, मणदूर परीसरात सोसाट्याच्या वाऱ्यासोबत जोरदार पाऊस.

  चांदोली परीसरात जोरदार वादळी पाऊस.

' सोनवडे,आरळा, मणदूर परीसरात सोसाट्याच्या वाऱ्यासोबत जोरदार पाऊस '.

शिराळा - प्रतिनिधि( नानासाहेब कांबळे.)

   चांदोली परिसरात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादऴी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.सोनवडे,आरळा, मणदूर परीसरात सोसाट्याच्या वाऱ्यासोबत जोरदार पाऊस झाला 

सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले .पावसामुळे परिसरात काही काळ विद्युत पुरवठा  खंडित झाला  होता .गेली आठ दिवस सातत्याने वादळी पावसाचा फटका परिसराला बसला आसुन  त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मका,उन्हाळी भाताचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अजूनही जोराचे वारे व पावसाची उघडझाप सुरु आहे. 




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .