उंडाळे (ता.कराड) येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू.


उंडाळे (ता.कराड) येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू.

उंडाळे - प्रतिनिधि(प्रदीप पाटील.)

उंडाळे ता.कराड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असुन सदर कोविड केअर सेंटरचे उदघाटन संपन्न झाले.

उंडाळे ग्रामीण रुग्णालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार फंडातून  30 लाख रुपये खर्चून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात  येणार असून एक महिन्याच्या आत  ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू होणार असल्याची घोषणा  केली.

याप्रसंगी सातारा जिल्हांचे पालकमंत्री व सहकार मंत्री मा ना बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री मा.आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व जि प सदस्य युवा नेते मा उदयसिंह पाटील उंडाळकर व कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उंडाळे सरपंच, उपसरपंच, तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .