कोयनावसाहत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुर्यकांत उर्फ राजू आप्पासो पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन....

 कोयनावसाहत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुर्यकांत उर्फ राजू आप्पासो पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन....     


मलकापुर/ प्रतिनिधी

कराड तालुक्यातील कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तसेच सरपंच परिषदेचे कराड तालुकाध्यक्ष सुर्यकांत उर्फ राजू  आप्पासो पाटील  वय ५० यांचे आज कोरोनाशी झूंज देत दु:खद निधन झाले. त्यांचे मुळ गाव वाळवा तालुक्यातील केदारवाडी हे होते. आई वडील नोकरी निमित्त कराडला कुटूंबासह स्थलांतर झाल्यामुळे ते सुरुवातीला कराडच्या सोमवार पेठेत राहण्यास होते.नंतर ते कोयनावसाहत येथे स्थायिक झाले. राजू पाटील यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते कोयनावसाहत परिसरामध्ये लोकप्रिय असे व्यक्तिमत्व झाले. त्यांनी कोयनावसाहत ग्रामपंचायतीमध्ये सन २००५ ते २०१० या कालखंडात पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर २०१५ ते आज अखेर ते सरपंच या पदावर कार्यरत होते. कोयनावसाहत ग्रामपंचायतीला निर्मलग्राम पुरस्कार मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.तसेच ते सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष होते. मनमिळावू स्वभाव असल्याने ते तालुक्यामध्ये सर्वांच्या परिचयाचे  होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कोयनावसाहत,मलकापुर,तसेच तालुक्यातील त्यांच्या हितचिंतकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.ते  कृष्णा उद्योग समूहाचे डाॅ.सुरेशबाबा भोसले, डाॅ.अतुलबाबा भोसले , विनायक भोसले, यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोयनावसाहतीची एकहाती सत्ता मिळवली होती. स्वच्छ कारभार, उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पस्चात आई ,वडील, पत्नी ,मुलगा, भाऊ ,भावजया,पुतने असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .