आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर. " कासेगाव (जि-सांगली) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन."

 

आदरणीय  बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर.

" कासेगाव (जि-सांगली) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन."



शिराळा - प्रतिनिधी (नानासाहेब कांबळे)

श्रद्धेय आदरणीय अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  10/05/2021 रोजी धम्म सम्राट अशोकनगर, कासेगाव येथे सकाळी 10 ते सायंकाळी 04 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अमर  माने यांनी केले आहे. 

शिबिराच्या वेळी वंचित आघाडीचे राज्य निरीक्षक प्रा. सम्राट शिंदे,राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, महिला आघाडीच्या राज्य सदस्या डॉ.क्रांती सावंत, सब पोलीस निरीक्षक अविनाश मते,यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तरी युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन उमेश कांबळे व सुशांत माने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केले आहे.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .