भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी श्री.सागर पाटील यांची निवड.
भारत सरकार मान्यता प्राप्त,
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी श्री.सागर पाटील यांची निवड.
पाटण: भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी ता.पाटण मंद्रुळकोळे गावचे श्री.सागर पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.पाटील यांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने संस्थापक मा.श्री. भाऊसाहेब कांबळे,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा.श्री बाबसाहेब कांबळे यांच्या शिफारसीने राष्ट्रीय लोकशाही विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही लोकशाही संकल्पना यशस्वी करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समितीचे ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे. संबंधित नियुक्तीस सागर पाटील मित्रपरिवार व व्यापारीवर्गातर्फे सागर पाटील याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment