अत्यावश्यक सेवेसह कराड ग्रामीण भागात अजुन बरेचं काही.
अत्यावश्यक सेवेसह कराड ग्रामीण भागात अजुन बरेचं काही.
दक्षिणमांड तिरावरुन________
"ब्रेक द चेन" कोरोना महामारीच्या काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. तर अनेक ठिकाणी छुप्यापद्धतीने चढय़ा दराने वस्तूंची विक्री सुरु आहे.कराड ग्रामीण विभागातील वाढती रुग्णसंख्या पाहता, संपुर्ण लाँकडाऊन जाहिर करण्यात आला , मात्र याला अपवाद तळीरामाच्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी अवैध व्यवसायकीच्यामध्ये जणु स्पर्धाच लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
काही दिवसांपासून दारूविक्री करणारी दुकाने बंद झाल्यामुळे तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. संचारबंदी, जमावबंदी असताना कराड ग्रामीणमधील बहुतांश गावांमध्ये सुरू असलेल्या दारूविक्रीला जोर आला आहे. इतर ठिकाणी दारू मिळत नसल्यामुळे गावांमध्ये चढ्या दराने दारूविक्री केली जात आहे. स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे दारूविक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे.
कराड ग्रामीण भागातील बड्या दारूविक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी स्थानिक व्यवसायिकांना बरोबरीत घेऊन दारूविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु केला असुन संबंधित व्यवसायिक "अवाच्या सव्वा" किमंतीत दारु विक्री करण्यात मशगुल आहेत तर संबंधित प्रशासन मात्र दुरदुर कोठेचं दिसत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कराड ग्रामीण भागात येणाऱ्या सर्रास गावांमध्ये छुप्या पद्धतीने बेकायदा दारूविक्री केली जाते. ओंड, टाळगाव घोगाव,येवती, येळगाव ही गावे यामध्ये आघाडीवर आहेत. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सातारा जिल्हात "ब्रेक द चेन"साठी विविध उपाययोजना सुरू आहेत. जमावबंदी, संचारबंदी केल्यानंतर केवळ डॉक्टर, मेडिकल्स अत्यावश्यक सोयीसुविधा सुरू आहेत. तरीही कराड ग्रामीण परिसरात तळीराम मद्य प्राशन करण्यासाठी या परिसरातील ढाब्यावर राजरोसपणे मार्ग धरत असुन गर्दीचे थव्वेच्या थव्वे पहावयास मिळत आहेत.गत दोन दिवसापुर्वी कराड परिसरात मार्निंग वाँकसाठी फिरण्यावर कडक कारवाई करण्यात आघाडीवर असणाऱ्या प्रशासनास येथे मात्र कशाची, व कसली अडचण उध्दभवत आहे, हे मात्र सर्वसामान्य जनतेला न सुटलेलं कोडंच आहे. आता सगळीकडेच बंद असल्यामुळे या गावांमध्ये विकल्या जाणाऱ्या बेकायदा व्यवसायिकांना चांगलाच भाव आला आहे. गावांलगत असण्या-या ढाबा लगतच्या ऊसाच्या शेतातुन, शेतालगत असणाऱ्या बांधातुन तर ओसाड माळरानावरील छप्परातून तर काही ठिकाणी मानवी वस्तीतील घरांतून दारूविक्री केली जात आहे. परवानाधारक दुकानांमधून दारू या बेकायदा व्यवसायिकांकडून विकत घेतली जावुन खेड्या पाड्यात तिप्पट, चौपट दराने विकली जात असुन मात्र स्थानिक पोलिस मात्र याकडे काणाडोळा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Comments
Post a Comment