मोबाईल कंपनीची केबल लाईनच खोदकाम देतंय अपघाताला निमंत्रण .

 मोबाईल कंपनीची केबल लाईनच खोदकाम देतंय अपघाताला निमंत्रण .

विठ्ठलवाडी तुळसण रस्त्याची दुरावस्थाः बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष.


दक्षिणमांड तिरावरुन :-

कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी, तुळसण रस्त्याच्या साईट पट्टीवर सध्या एका मोबाईल कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरु असुन ही केबल लाईन कोळेवाडी पर्यंत आहे. सध्या पावसाळाची चाहुल लागताच सदरिल काम केबल टाकण्याच्या कामाला गती आली असुन सदरील केबल ह्या रस्त्यालगत असण्या-या साईड पट्टीवर तसेच काही ठिकाणी रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या नालामध्ये टाकली जात असुन ऐकेरी वाहतुक असण्या-या रस्त्याची अवस्था दैयनिय दिसुन येत आहे .  चालु असण्या-या रस्त्यासाठी संबंधित विभागाची नक्कि परवानगी घेतली आहे काय ? आणि घेतली असेल तर ती रस्त्यापासुन किती अंतरावर आहे हे संबंधित ठेकेदार, कंपनीच्या अधिका-यांनी स्पष्ट करावी अशी मागणी या विभागातील सर्वसामान्यातुन होत आहे.

  सार्वजनिक रस्त्यांची व रस्त्यालगत असणाऱ्या नाल्याची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार विठ्ठलवाडी, तुळसण परिसरात घडत असून  या खोदकामाकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न करता दुर्लक्ष का ? केले जात आहे. बांधकाम विभाग खासगी मोबाईल कंपनीच्या दावणीला बांधला आहे का अशी नागरीकांच्यातून प्रतिक्रीया येत आहेत.

 हा रस्ता जेसीबीच्या साह्याने डांबरी रस्त्याला लागूनच चर खोदली जात आहे. चरीची काढलेली माती चक्क रस्त्यावर टाकली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मातीचे ढीग पडल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीसह अपघातास कारणीभुत ठरत आहेत. काही दिवसांपासून जेसीबीच्या साह्याने दिवासाढवळ्या रस्ता खोदला जात असताना याची माहिती सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्हती का, जाणूनबुजून याकडे डोळेझाक करण्यात येत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात कराड येथील उपविभागीय अभियंता अधिकारांशी काही स्थानिकांनी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेण्याची तसदी घेतली नाही. सदरील विभागाच्या वरीष्ठ कार्यालयाकडुन संबंधित कामाची चौकशी करुन रस्त्याची होणारी हानी थाबंवुन पावसाळ्यापुर्वी रस्त्ता व नाले पुर्वरत करण्यात यावे अशी मागणी विठ्ठलवाडी, तुळसण विभागातील नागरिकांकडून  होत आहे.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .