उंडाळे येथील पुलाचे काम चालूः पर्यायी मार्ग उपलब्ध.. शार्टकटच्या नादात दुचाकीस्वार जीव घालतात धोक्यात..
उंडाळे येथील पुलाचे काम चालूः पर्यायी मार्ग उपलब्ध..
शार्टकटच्या नादात दुचाकीस्वार जीव घालतात धोक्यात..
दक्षिणमांड तिरावरुन...
कराड - चांदोली अंतरराज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर दिसुन येते. त्याच मार्गावर ओंड-उंडाळे या गावाच्यामध्ये येणारा दक्षिणमांड नदिवरील पुलाचे काम गत चार महिन्यापासुन सुरु असुन ग्रामीण भागातील कराड दळणवळणाची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने उंडाळे येथुन ठ्ठकराची मळी व सवादे मार्गे तसेच तुळसण फाटा असे तीन-तीन मार्ग पर्यायी म्हणून ठेवण्यात आले आहेत. यातील सवादे मार्ग हा जड वाहनासाठी तर तुळसण व ठ्ठकराची मळी हे दोन मार्ग हे दुचाकी व इतर छोट्या वाहनासाठी मार्ग पर्यायी ठेवले आहेत. ज्या ठिकाणी पुलाचे काम चालु आहे त्याच्या अंतरातील एक ते दिड किलोमीटरवर रस्ता पुर्ण बंद केला असून रस्त्या दोन्ही बाजुस शेती क्षेत्र व लोकवस्ती असल्यामुळे त्यांचा मार्गाची व्यवस्था प्रशासन व ठेकेदारांनकडुन करण्यात आली आहे, मात्र दक्षिणमांड नदीच्या पुलाच्या बांधकामाच्या अनुशंगाने पुलाजवळील कामगार व कामाच्या ठिकाणी साहित्य ने-आण करण्यासाठी सोप्पंस्कर व्हावा यासाठी पुलाच्या बाजुने कच्च्या रस्त्याची व्यवस्था केली असुन सध्या काही दुचाकीस्वार या खुशकीच्या मार्गाचा वापर करताना दिसून येत आहेत. पुलाच्या कामामुळे लगतच्या परिसरात बांधकामाचे साहित्य अस्तावस्त विखुरलेल्या अवस्थेत दिसुन येत असुन काही अवैध व्यवसायिकासह बहुतांश दुचाकीस्वार याच मार्गाचा अवलंब करताना दिसुन येत असल्याचे स्थानिकामधुन आश्चर्य व्यक्त होत आहे. गत महिन्यात याच पुलाच्या ठिकाणी कोल्हापूर च्या दुचाकीस्वाराचा अंदाज न आल्याने अपघात होत दोघानां आपला जीव गमवावा लागला होता. त्याचीचं पुनरावृत्ती होत आणखी एखाद्या अपघात होण्याअगोदर संबंधित ठेकेदार व प्रशासनाने या गोष्टिकडे लक्ष देवुन योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी स्थानिकांनमधुन होत आहे.

Comments
Post a Comment