मा.जयंत पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन समारंभ संपन्न.
मा.जयंत पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन समारंभ संपन्न. कासेगाव - प्रतिनिधी. कासेगांव ग्रामपंचायत कासेगांव अंतर्गत नागरी सुविधा 15 वा वित्तआयोग व ग्रामनीधीतुन मुख्य रस्ता डांबरीकरण करणे या कामाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री मा. शिवाजीराव नाईक , मा.आ.मानसिंगराव नाईक , मा.देवराज पाटील , मा.उदयसिंह पाटील , लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पना गावडे, उपसरपंच मा.सुजित पाटील , ग्रामविकास अधिकारी मा.राहुल सातपुते सर्व ग्रामपंचायत सदस्य, इतर मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.