श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोवे.चा एस.एस.सी. निकाल 100 % टक्के.

 श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोवे.चा एस.एस.सी. निकाल 100 % टक्के.


सातारा प्रतिनिधी :-

             श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शिक्षण क्षेत्रातही गुणवत्तेचा झेंडा कायम ठेवला आहे.यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे.इयत्ता दहावी मध्ये कु.सिध्दी धनंजय भोसले,कु.ऋतुजा आनंदराव साळुंखे या दोघींनी 90.40 टक्के समान गुण मिळवूण विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.तसेच कु.अनुष्का निलेश शिंदे हिने 89.40 टक्के गुण मिळवूण व्दितीय क्रमांक ,तसेच कु.अपुर्वा अजित पडगळ हिने 85.20 टक्के गुण मिळवूण विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला. या वर्षी विद्यालयातील एकुण 19 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त झाली तर 16 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली.

                 श्री कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव ,सचिव श्री तुकाराम आण्णा जाधव,संचालक भुजंगराव जाधव तसेच प्राचार्या श्रीमती विभा साबळे ,वर्गशिक्षक श्री लक्ष्मण उबाळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .