बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप. येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप. उंडाळे - प्रतिनिधी. येळगाव जिल्हा परिषद गटातील घोगाव या ठिकाणी कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ.अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येळगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, नेते, बूथ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्य वस्तूंचा संच वाटप याचा भव्य असा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये विविध लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार योजनेतून इसेन्शियल किट (पेठी) व सेफ्टी किट (बॅग) वाटप करण्यात आले. येळगाव जिल्हा परिषद मधील 1000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ देण्यात आला. या कार्यक्रमासाठी येळगाव जिल्हा परिषद गटातील ऍड.मा.बाळासाहेब पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे, भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, येळगाव विकास सेवा सोसायटी चेरमन मा.अक्षय शेटे, सहकारमहर्षी स्व.जयवंतराव भोसले प...
महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. घोगाव येथील संतकृपा शिक्षण संस्था, फार्मसी काॅलेजमध्ये भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार मा.श्री.डॉ.अतुलजी भोसले (बाबा) व तहसील कार्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री.शिवाजी महाराज "महाराजस्व समाधान शिबीर" उत्साहात पार पडले.या शिबिरात कराड दक्षिण मधील, उंडाळे विभागातील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला व डोमासाइल वितरण करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार श्री.बाजीराव पाटील, काॅलेज ऑफ डी फार्मसी च्या प्राचार्य सौ.वैशाली पाटील, घोगाव महसूल अधिकारी सौ.तृप्ती दाते, भाजपा कराड दक्षिण तालुका अध्यक्ष श्री.प्रविण साळुंखे, अँड. श्री.बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा सोशल मिडिया उपाध्यक्ष श्री.पंकज पाटील, माजी उपसरपंच सवादे श्री.संजय शेवाळे, माजी सरपंच टाळगाव श्री.आण्णासाहेब जाधव, माजी सरपंच म्हासोली श्री.आण्णासाहेब शेवाळे, चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव मा.अक्षय शेटे, उपसरपंच घोगाव श्री.निवास शेवाळे, माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव श्री.बाजीराव शेटे (सर), माजी चेअरमन विकास सेवा स...
सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर. शिराळा – प्रतिनिधी. ग्रामपंचायत ही संस्था गावाचा कारभार आणि विविध विकास योजना राबवित असेल तरच त्या गावाचा सर्वांगीण विकास होतो. सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने गाव कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायत कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 अन्वये चालतो तसेच नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. या सगळ्या प्रक्रियातून जाऊन सोनवडे (ता.शिराळा) ग्रामपंचायत स्थापन झाली. पण या ग्रामपंचायतीला आपल्या कार्याचा विसर पडलेला दिसून येतो. कृषी पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, रस्ते बांधणी, ग्रामोद्योग आणि सहकार प्रशासन या प्रमुख कार्यासाठी ग्रामपंचायत काम करणं अपेक्षित असतं परंतु सोनवडे गावातील आरोग्य आणि रस्ते बांधणी या कार्यासाठी दुर्लक्ष केलेले अढळून येते. जिल्हा परिषद शाळा सोनवडे ते तक्षशिला नगर याकडे जाणारा ग्राम अंतर्गत रस्ता लोकांच्या रहदारीसाठी खुला आहे. पण तक्षशिला नगर वस्तीतील सांडपाण्याची व्यवस्था दुर्लक्षित झाल्याचे आढळून येते, यामुळे रस्त्यावर गटारी...
Comments
Post a Comment