नांदलापुर येथील जि. प. प्राथ. शाळेत प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न.
नांदलापुर येथील जि. प. प्राथ. शाळेत प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न.

रेठरे बुद्रुक वार्ताहर --.
नांदलापुर ता.कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेचा पहिला दिवस म्हणजेच शाळा प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश शिर्के होते.
यावेळी प्रामुख्याने शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा पाटील होत्या.तसेच कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत शिर्के,उपशिक्षिका श्रीमती नयन पाटील,सौ राजश्री रवलेकर,प्रज्ञा अलकुंटे,मीनाक्षी वाघमोडे,पदवीधर शिक्षक नारायण सातपुते,तसेच ग्रामस्थ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मुलानी घोषणाबाजी करत ढोल ताशांच्या गजरात गावातून प्रभात फेरी काढली ,तदनंतर शाळेच्या मैदानावर इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते आठवी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्ते वाटप करण्यात आली.तसेच शाळेत नव्याने अडमिषण करून दाखल झालेय विद्यार्थांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
जवळपास पावणे दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टी उपभोगून शाळेत उपस्थित राहिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनी सर्व विद्यार्थ्यांना खावू वाटप केला.
दुपारच्या सत्रात शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यासाठी गोड जेवण करण्यात आले होते शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नियोजन बद्द आणि उत्साही वातावरणात संपन्न झालं.
उपस्थितांचे स्वागत श्रीमती शोभा पाटील यांनी केले,प्रज्ञा अलकुंटे यांनी केले.आभार नारायण सातपुते यांनी मानले.
---------------------------------------------------------
Comments
Post a Comment