कोडोली गावचा सुपुत्र नितिन सकट झळकला टीव्ही सिरीयल मध्ये.
कोडोली गावचा सुपुत्र नितिन सकट झळकला टीव्ही सिरीयल मध्ये.
कार्वे प्रतिनिधी :- प्रविण पाटील
कृष्णा नदी तीरावर्ती वसलेल्या कोडोली या छोट्याशा गावातील लहान पणापासून कलेची आवड असणारे नितिन सकट यांना सोनी मराठी टीव्ही चॅनेल वरील ज्ञानेश्वर माऊली या मालिका मध्ये श्रावण नावाचे पात्र अभिनय करण्यास भेटले आहे. नितीन सकट हे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सोनी मराठी चॅनेल वरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकांमध्ये आपणास सोमवार ते शनीवार सांय ७ वाजता भेटणार आहेत. तसेच त्यांना सोनी मराठी टीव्ही चॅनेल वरील आशिर्वाद तुझा एकविरा आई या सिरीयल मध्ये हि छोटीशी भूमिका मिळाली आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ८ वाजता प्रसारित होत आहे. यावेळी नितीन सकट आपणास भेटणार आहेत.
यापूर्वी त्यांनी कोडोली गावामध्ये गणेश उत्सवात सादर केल्या जाणाऱ्या नाटकामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या कलेला वाव देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांनी समाज उपयोगी कार्यक्रमात सहभाग नोंदवून सामाजिक जनजागृती,पर्यावरण व अंधश्रद्धा विषयी नाटिका सादर करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. ही कला जोपासताना त्यांना मोलाचे सहकार्य विशाल पाटील तसेच कृष्णा मोरे टेलर यांचे लाभले. तसेच त्यांना टीव्हीवरील सिरीयल मध्ये जाण्यासाठी मोलाचे योगदान श्रेयश जगताप यांनी दिले.


Comments
Post a Comment