दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी.

 दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी.

                दहावीचा निकाल 93.83 टक्के .

 गोंडवाना न्यूज रिपोर्ट-

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल आज जाहीर झाला. दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी निकाल 3.11 टक्क्यांनी निकाल घसरला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे.

यावर्षी कोकण विभागानं बाजी मारली , तर नागपूर विभागाचा निकाल कमी आहे. कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के इतका लागला . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला.

दहावी निकालाची विभागनिहाय टक्केवारी.

कोकण विभाग : 98.11 टक्के
कोल्हापूर विभाग : 96.73 टक्के
पुणे विभाग : 95.64 टक्के
मुंबई विभाग : 93.66 टक्के
औरंगाबाद विभाग : 93.23 टक्के
अमरावती विभाग : 93.22 टक्के
लातूर विभाग : 92.67 टक्के
नाशिक विभाग : 92.22 टक्के
नागपूर विभाग : 92.05 टक्के


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .